सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आरोग्य विमा आणि कोरोना... जाणून घ्या या खास तरतुदी महामारीने ग्रासलेल्या जगभरातील नागरिकांना या दुखण्यापासून स्वतःचे संरक

03 May 2021 By
819 0 Comments
post-1

महामारीने ग्रासलेल्या जगभरातील नागरिकांना या दुखण्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे या समस्येने ग्रासले आहे. ज्या देशांनी सुरुवातीला 'हा बागुलबुवा आहे' अशी भूमिका घेतली, तिथे आता लागण होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. आपल्याकडे ताळेबंदी टप्याटप्याने शिथिल करण्यास सुरुवात झाली आणि दोन आठवड्यात नव्या नव्या ठिकाणी रोगाची लागण झाली असल्याचे दिसून येत आहे.

अशा वेळी ज्यांना उपचार घ्यावे लागत आहेत, इस्पितळात भरती व्हावे आहे. त्यांच्या भयाने व्याकुळ झालेल्या मनात अजून एक शंका थैमान घालू लागते, ती म्हणजे 'माझा आणि कुटुंबीयांचा आरोग्यविमा आहे. त्यातून उपचार आणि अनुषंगिक खर्चाची भरपाई होणार की नाही?' कारण आरोग्यविमा काढताना ज्या शुल्क आकारणी न करणाऱ्या इस्पितळांची यादी मिळाली आहे त्यांचा विशेष उपयोग नाही असा अनुभव अनेकांना येतोय, खर्च तर भरपूर होत आहे. तसेच आरोग्यविमा असेल तरी, तो महामारी म्हणून शिक्का मारलेल्या या आजारांच्या उपचारांसाठी उपयोगी आहे की नाही, हा प्रश्न रुग्णासह सर्वानाच कुरतडत आहे. बर उपचारांचा खर्च किती असावा, याबाबत एकामागून एक सूचना येत आहेत यातील 'काय ग्राह्य, कुठे ग्राह्य, कुणासाठी ग्राह्य आणि कधी ग्राह्य' याबाबत गोंधळाचे वातावरण आहेच.

जोपर्यंत रुग्णांची संख्या मर्यादित होती तोपर्यंत अनेक सर्वसाधारण विमा कंपन्या कंपन्या यासंबंधीचे दावे तत्परतेने मान्य करत होत्या. जेव्हा ही संख्या वाढू लागली, तसेच जागतिक आरोग्य संघटनेने यास जागतिक महामारी म्हणून घोषित केले तेव्हा असे दावे  स्वीकारण्यास अनेक विमा कंपन्या काहीतरी फुटकळ कारणे काढून नकार देऊ लागल्या त्यातून पॉलीसीधारक व कंपनी असे वाद होऊ लागले. त्यामुळे ज्यांच्याकडे अशा पॉलिसी होत्या त्यांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. विमा हा करार असतो तो करत असताना ग्राहकाने आणि विमा कंपनीने त्यात सगळे मुद्दे स्पष्ट केलेले असतात. त्यामध्ये महत्वाची यादी असते, वगळलेल्या आजारांची. मात्र आधीपासूनच काढलेल्या आरोग्यविमा पॉलिसीमध्ये आणि वा या पॉलिसीमध्ये जोपर्यंत, 'विशिष्ठ विषाणूजन्य आजार स्पष्टपणे वगळलेले नसतील' तोपर्यंत अशा सर्व आरोग्यविमाधारकांचे दावे, तांत्रिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्टीने मंजूर करावे लागतीलच. दाव्यांची संख्या खूप आहे हे दावा फेटाळण्याचे कारण असू शकत नाही. आरोग्यविमा या खाली भारतात वितरित करण्यात आलेल्या सर्व  पॉलिसी  त्यात असलेल्या कमाल अटी मर्यादेसह यातील भरपाई दावे मान्य करतील. 

आरोग्य विमा पॉलिसी घेतल्यापासून ३० दिवसानंतर झालेले आजार दाव्यासाठी विचारात घेतले जातात फक्त अपघात झाला असेल तर झालेल्या  उपचार खर्चास हे दिवसांचे बंधन नाही. तेव्हा ३१ व्या दिवसापासून कोविड १९ साठी उपचार घेतल्यास त्याचे दावे पॉलिसी मर्यादेनुसार मंजूर होयला हवेत. हा पूर्णपणे नवीनच आजार असल्याने त्याची गणना पूर्वीचा आजार या सदरात होऊ शकत नाही.

रुग्णांची संख्या आणि उपलब्ध सोयी यांचा मेळ घालणे दुरापास्त आहे त्यामुळे काही रुग्णांना विलगीकरण कक्ष उपलब्ध नसतात. त्यांची सोय रुग्णालयाजवळील हॉटेल /वसतीगृहात अशा ठिकाणी करण्यात येत आहे. तेथे जाऊन डॉक्टर रुग्णांची तपासणीही करीत आहेत अशा वेळी हे विलगीकरण रुग्णालयाच्या बाहेर असले तरी तो रुग्णालयीन उपचारांचा भाग ठरतो. त्यामुळे त्याचा खर्चही उपचार खर्च समाविष्ट करण्यात यायला हवा. (पुढील १ ब पहावे)

यातील भरपाई संबंधीत तक्रारी आल्यावर विमा विकास प्राधिकरण (IRDA) या नियामकानी कोविड १९ संबंधित उपचार त्याचे दावे तत्परतेने मंजूर करण्यासाठी ४ मार्च २०२० रोजी काढलेल्या IRDAI/HLT/REG/CIR/054/03/2020 या परिपत्रकानुसार मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून ती आयात/निर्यात आणि कृषी क्षेत्रासाठी विमा देणाऱ्या कंपन्या सोडून इतर सर्व जनरल इन्शुरन्स कंपन्यांना तात्काळ लागू झाली आहेत यामुळे सर्वच आरोग्यविमा धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या पत्रकाचा सर्वसाधारण आशय असा-

 १. नियमकानी मंजूरी दिलेल्या आरोग्यविमा योजनांच्या त्यातील तरतुदींच्या अधीन राहून  विमाधारकाना येणाऱ्या अडचणींचा विचार करून हॉस्पिटलखर्चाचे दावे हाताळण्याचे निकष असे असावेत.

अ) कोविड १९ मुळे ज्यांना उपचार घ्यावे लागले अशा सर्वांचे प्रतिपूर्ती दावे निकाली काढण्यास प्राधान्य द्यावे.

ब) ज्या रुग्णांना दवाखान्यात राहावे लागले यासाठी झालेल्या उपचारासाठी झालेला खर्च त्याचप्रमाणे दवाखान्यातून घरी सोडल्यावर विलगीकरण आवश्यक असल्याने त्याकाळातील येणारा उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची नियमानुसार भरपाई मिळावी.

क) विमा कंपनीच्या दावे पुनर्विचार समितीने, कोविड १९ आजारासाठी केलेल्या खर्चाची भरपाई नाकारण्याची कारणे सुयोग्य असल्याची खात्री, दावा नाकारण्यापूर्वी करून  घ्यावी. 

२. सर्वसाधारण विमा कंपन्यांनीआरोग्यविमा योजनेच्या प्रमाणे लोकांची गरज ओळखून कोविड १९ सारख्या विषाणूजन्य आजाराशी सामना करताना येणाऱ्या खर्चाची गरज भागवतील अशा विशेष योजनांची निर्मिती करावी. 

वरील क्रमांक २ ला सकारात्मक प्रतिसाद म्हणून अनेक सर्वसाधारण विमा कंपन्यांनी कोविड १९ साठी विशेष पॉलिसी निर्माण केल्या असून अशी पॉलिसी घेतल्यापासून १६ दिवसानंतर कोविड १९ बाधा झाल्यास म्हणजेच हा आजार झाला असल्याची चाचणी सकारात्मक आल्यास विमाकरारात मान्य केलेली उपचार रक्कम किंवा एकरकमी खर्च भरपाई देणाऱ्या योजनांची विक्री चालू केली आहे. या विशेष पॉलिसी असून त्या फक्त याच विशिष्ठ आजारासाठी असून त्यातून अन्य आजारांच्या खर्चाची भरपाई होणार नाही, हे लक्षात घ्यावे.

अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या नोंदणीकृत आरोग्य विमा सल्लागाराची मदत घेऊ शकता.********************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://bit.ly/2EP0cPm  

Share This:
Tags :

प्रतिक्रिया

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...