सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आपले फायनान्शिअल चेकअप केले आहे का? तुमच्या मेडिकल चेकअप इतकाच फायनान्शिअल चेकअपदेखील महत्वाचा असतो. आपली

20 Jul 2021 By
1336 1 Comments
post-1

तुमच्या मेडिकल चेकअप इतकाच फायनान्शिअल चेकअपदेखील महत्वाचा असतो. आपली आर्थिक स्थिती तपासण्यासाठी व भविष्यातील अर्थविषयक संभाव्य समस्या जाणण्यासाठी फायनान्शिअल चेकअपमध्ये आपल्या वित्तीय रणनीतीचा आढावा घेतला जातो. आपल्या ध्येयाकडे जाताना आपण करीत असलेल्या प्रगतीचे मूल्यमापन करण्याची व आपल्या वैयक्तिक स्थिती नुसार आवश्यक बदल करण्याची एक संधी फायनान्शिअल चेकअपमुळे प्राप्त होते.

वार्षिक फायनान्शिअल चेकअप हा आपल्या आर्थिक नियोजन प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग असतो. तरी बर्‍याच लोकांना त्याचे महत्व अजूनही समजलेले नाही. वार्षिक फायनान्शिअल चेकअप म्हणजे तुम्हाला व तुमच्या वित्तीय सल्लागाराला तुमची वित्तीय नियोजन योजना तपासण्यासाठी किंवा टू डू लिस्ट बनवण्यासाठी आणि तुमच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्याची एक संधी असते. मागील वर्षातील घडलेल्या बदलांचा तुमच्या नवीन धोरणात समावेश करण्याची ही वेळ असते. आपले जीवन गतीशील असले तरी कधीच स्थिर नसते. त्यामुळे आपली वित्तीय योजना नेहमीच चांगली असावी.

वार्षिक वित्तीय पुनरावलोकनामध्ये तुम्ही व तुमचे वित्तीय सल्लागार मागील वित्तीय योजनांमधील अडचणीचा अभ्यास करता व काय बदल घडला हे पहाण्यासाठी तुमची संसाधने, उद्दिष्टे व प्राधान्य असलेले हेतू यांचे पुनरावलोकन केले जाते. त्यामुळे व्यस्त जीवनात एक पाऊल मागे घेता येते, उद्दिष्टांचे पुनरावलोकन होते व आपले प्राधान्य कायम राहते. तसेच ध्येयपूर्तीच्या दिशेने जाताना आपण योग्य वाटचाल करत आहोत की नाही किंवा योग्य मार्गाने जात असल्यास त्याकडे लक्ष केंद्रीत करता येते. त्यामुळे तुम्हाला वार्षिक वित्तीय तपासणी (Annual financial checkup ) हे निरंतर केले पाहिजे. तुम्हाला फायनान्शिअल चेक अप मुळे आपण आपली ध्येयपूर्ती करताना तुमच्या वित्तीय व जीवनातील उद्दिष्टांची तपासणी करणे शक्य होते. तसेच सतत होत असलेल्या बदलांचे पुनरावलोकन करण्याची ही एक संधी असते.

बदलत्या स्थितीनुसार विकसित होणार्‍या कोणत्याही योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी फायनान्शिअल चेकअप महत्वाचा असतो. त्यामुळे ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवा. कारण फायनान्शिअल चेकअप कडे दुर्लक्ष केला तर तुमची आर्थिक स्थिती ढासळू शकते. 

Share This:
Tags :

प्रतिक्रिया

sandip on 18 Nov 2021 , 9:29AM

nice

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...