सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आर्थिक नियोजन आणि सहजीवन आपल्या सर्वांचे आर्थिक जीवन दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. प्रश्न हा आ

04 Feb 2019 By श्री. महेश चव्हाण
387 3 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

आपल्या सर्वांचे आर्थिक जीवन दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. प्रश्न हा आहे की याबाबाबत तुम्ही काय करणार आहात? तुमच्या आत्ताच्या आर्थिक परिस्थिती बद्दल रडत बसणार आहेत की इतरांना दोष देत बसणार आहात? तुम्हाला जर तुमचे आर्थिक जीवन एका उंचीवर नेऊन ठेवायचे असेल तर तुम्हाला संपत्ती निर्माण करावी लागेल. तुमच्या भविष्याचा ताबा मिळवण्यासाठी तुमच्या उत्पन्नाचे स्रोत तुम्हाला वाढवावे लागतील आणि अनावश्यक खर्चाना नियंत्रित करावे लागेल आणि तेही आजच! हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा पती-पत्नी दोघांमध्ये आपल्या आर्थिक जीवनाबद्दल स्पष्ट चित्र तयार आहे.

गेल्या ३ वर्षात आम्ही जवळपास २०० परिवारांचे आर्थिक नियोजन करून दिले आणि त्यामध्ये आम्हाला जाणवलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ‘जोपर्यंत पती आणि पत्नी यांच्यामध्ये स्वतःच्या आर्थिक जीवनाबद्दल एकवाक्यता येत नाही तोपर्यंत ते त्यांची भविष्यातील आर्थिक ध्येयं गाठू शकत नाहीत’ कारण बहुतेक वेळा जेव्हा आम्ही दोघांना समोर बसवून आर्थिक ध्येयाबद्दल विचारतो तेव्हा पुढील अनुभव येतात.
 
  • घर घेणे हे जवळपास ६०% आर्थिक नियोजनामध्ये असलेले ध्येय असते. जेव्हा पती १ BHK घेण्यासाठी नियोजन करत असतो त्या वेळी पत्नीला २ BHK घ्यावासा वाटत असतो (आर्थिक परिस्थितीबद्दल स्पष्टता नसल्यामुळे किंवा जवळच्या कुणाशी तरी असलेल्या इर्ष्येमुळे)
  • पत्नी पै नि पै साठवणारी असते तर पती खर्चालाल किंवा याच्या उलट असते त्यामुळे खटके उडत असतात. 
  • पतीला मोठी गाडी घ्यावीशी वाटते तर एवढी महागडी गाडी नको असे पत्नीचे म्हणणे असते.

वरील आम्हाला आलेले अनुभव आहेत आणि तुम्हीही असे मतभेद आजूबाजूला किंवा स्वतःच्या परिवारातही झालेले पहिले असतील हो ना? यातून काय साध्य होतं माहितेय तुम्हाला? खरं तर काहीच नाही. कारण जोपर्यंत तुम्ही एकमेकांच्या आवडी-निवडी, एखाद्याचे म्हणणे एकूण त्यावर विचार करून एक स्पष्ट ध्येय ठरवत नाही तोपर्यंत ते ध्येयच होऊ शकत नाही आणि जिथे ध्येय नाही ते साध्य होणारच कसे?

आपण जेव्हा सुट्टीमध्ये कुठे फिरायला जायचे नियोजन करतो तेव्हा असे मतभेद असतात का? पतीला वाटतयं केरळला जाऊया आणि पत्नीला वाटतयं हिमाचलला जाऊया. अश्या परिस्थितीमधे तुम्ही नियोजन करू शकता का? घराबाहेर निघू शकता का? नाही ना? आणि पत्नी ने जबरदस्ती हिमाचलला जाणे ठरवले तर पती त्या सुट्टीचा आनंद घेऊ शकतो का? असेच काहीतरी आपल्या आर्थिक जीवनाचे असते आणि अशावेळी ज्याप्रमाणे आपण भारतीय आपले वैवाहिक जीवन एकमेकांना समजून घेऊन व्यतीत करतो तसेच आर्थिक जीवनातही एकमेकांना समजून घेणे आले, तडजोड आली आणि यातूनच पुढील आर्थिक भविष्याचा वेध घेता येईल.

लक्षात ठेवा पती आणि पत्नीही बैलगाडीची दोन चाके आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीचा समतोल, सामान वेग, असायला हवा जेणेकरून आयुष्याच्या उत्तरार्धात अमिताभ-हेमा मालिनी सारखे बागबान होण्याची वेळ येणार नाही. मुले मोठी होतील, स्वतःच्या विश्वात रममाण होतील तेव्हा तुमच्याकडे १ BHK आहे की २ BHK यापेक्षा एकमेकाला कसे समजून घेतलेत एकमेकांच्या इच्छांसाठी कशाप्रकारे मेहनत केलीत याला जास्त महत्व असेल. हो ना?

***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

प्रमोद हळबे on 04 Feb 2019 , 1:43PM

योग्य मार्गदर्शन

रणजित नाटेकर on 04 Feb 2019 , 10:47AM

धन्यवाद

Sachin ghatage on 04 Feb 2019 , 9:22AM

Good sir

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...