सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

माझ्याकडे २-३-५ लाख आहेत कोणता व्यवसाय करू ??? माझ्याकडे २-३-५ लाख आहेत कोणता व्यवसाय करू ??? अशा पोस्ट आपल्याला फेसब

27 Nov 2019 By श्री. महेश चव्हाण
2357 11 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

माझ्याकडे २-३-५ लाख आहेत कोणता व्यवसाय करू ??? अशा पोस्ट आपल्याला फेसबुक व्हाॅट्सअॅप ग्रुप वर सतत येत असतात... त्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे.

१. तुमच्याकडे ठराविक रक्कम आहे म्हणून तुम्ही व्यवसाय सुरू करून यशस्वी होण्याची स्वप्ने पाहत असाल तर जरा थांबा आणि नीट विचार करा. (जसे तुमच्याकडे बॅट आणि बॉल आहे म्हणून तुम्हाला कोणी क्रिकेट संघात घेईल का?)

२. फेसबुकवर व्हाॅट्सअॅप वर मेंबर विविध स्तरातील असतात प्रत्येक जण तुम्हाला त्याच्या अनुभवावरून व्यवसाय सांगेल तो व्यवसाय तुमच्या गावात, शहरात चालेलच असे नाही.

३. व्यवसाय सुरू करण्याआधी त्या व्यवसायात १-२ वर्षे नोकरी करता येते का पहा.

४. आज नोकरी मिळत नाही म्हणून खूप तरुण मुले आई-वडिलांकडून भांडवल घेऊन व्यवसाय चालू करायची घाई करतात. घाई न करता त्या व्यवसायातील यशस्वी किंवा अयशस्वी लोकांच्या भेटी घ्या.

५. २-३-४ लाख ही सर्व रक्कम व्यवसायावर लावू नका. व्यवसाय चालू झाल्यावर खर्च जाऊन कमाई हातात यायला कधी कधी वर्षे लागते त्यामुळे घर खर्च ची पण तरतूद करून ठेवा.

७. व्यवसाय चालू केल्यावर असंख्य गोष्टींना तोंड दयावे लागते यासाठी सुरुवातीपासूनच आपली कागदपत्रे परवाने याची कायदेशीर पुर्तता करुन ठेवा.

८. व्यवसाय करणे हे सांघिक काम आहे त्यामुळे आपला संघ आधी निवडायला घ्या…नाहीतर ऐन वेळेला भेटेल त्यातून कामगार किंवा सोबती निवडावे लागतात.

९. खुप वेळेला आपल्याला भांडवल देणारे जवळचे मित्र परिवार असतात… कितीही जवळचे असतील तर त्याचा मोबदला किंवा परतावा आधीच ठरवा.

१०.  त्या त्या व्यवसायातील जाणकार मेंबर कडून सल्ल्ला मागा…डायरेक्ट पोस्ट टाकून १०० सल्ले घेऊन विचारात पडण्यापेक्षा योग्य व्यक्तीशी चर्चा करा.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

babaji on 12 Feb 2022 , 5:36AM

point no 3 is important. Experience is your guide

Krishna Arjun Devkar on 07 Feb 2022 , 10:00PM

छान मार्गदर्शन सर

अविनाश निंबाळकर on 27 Aug 2021 , 4:09PM

शंभर टक्के सत्य 👍🏻🙏

pravin s avhale on 23 Apr 2020 , 11:05AM

Nice

PRAVINA PILLE on 03 Apr 2020 , 4:11PM

सर बरोबर बोललात,सल्ला तज्ञाकडूनच घ्यावा

Ravindra on 07 Mar 2020 , 9:43PM

sir....khup. chan. .....

रणजित नाटेकर on 28 Nov 2019 , 12:11AM

सुंदर

nandkishor on 27 Nov 2019 , 1:35PM

छान मार्गदर्शन

sandeep on 27 Nov 2019 , 12:34PM

प्रकाश भोसले सर यांचे app व्यवस्थित चालत नाही त्यांना plz कळवा.

sandeep on 27 Nov 2019 , 12:33PM

सर,अगदी खरे आहे .

sachin on 27 Nov 2019 , 12:15PM

👌

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...