सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तुम्ही आर्थिक साक्षर आहात का? हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध गीतकार, पटकथा लेखक आणि अभिनेते पीयूष म

07 Mar 2019 By श्री. महेश चव्हाण
677 2 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

‘हल्की-फुल्की सी है जिंदगी…
बोझ तो ख्वाहिशों का है।’


हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध गीतकार, पटकथा लेखक आणि अभिनेते पीयूष मिश्रा यांनी या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचं सार मांडलंय. ख्वाहिशे म्हणजेच आपल्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा, आशा-आकांक्षा आणि स्वप्नांचा खेळ… म्हटलं तर आयुष्यातली गुंतागुंत वाढवतात अन् म्हटलं तर आयुष्याला अर्थ देतात. मात्र स्वप्नपूर्तीची आशा बाळगताना आपल्या उद्दिष्टांना वास्तवाची आणि काटेकोर नियोजनाची जोड असणंही तितकंच आवश्यक असतं. 

आयुष्याचं दीर्घकालीन नियोजन करत असताना करीअर, संसार आणि कौटुंबिक जबाबदार्यांशइतकाच महत्त्वाचा पण तितकाच दुर्लक्षित विषय म्हणजे ‘आर्थिक साक्षरता’. आर्थिक नियोजन हा केवळ पुरुषांनी किंवा घरातल्या कमावत्या व्यक्तीनं लक्ष घालण्याचा विषय नसून, संपूर्ण घराचं महिन्याचं बजेट चोख निभावणार्याघ महिलावर्गानंसुद्धा याकडे अधिक गांभीर्यानं पाहायला हवं.

वरवर पाहता आपण सगळेच स्वतःला अर्थसाक्षर समजत असतो. महिन्याचे सगळे खर्च करून उरलेल्या (उरलेच तर) पैशांची बचत (!) करण्याची सवय बहुतेकांना असते. आणि मग त्या ठरावीक शिलकीतून मार्च महिना उजाडला, की प्राप्तिकर वाचवण्याच्या धडपडीतून उतरवलेली विमा पॉलिसी, पीपीएफ-पोस्टात केलेली गुंतवणूक अशा उपाययोजनांद्वारे कर वाचवण्यासोबतच आपण आपलं भविष्यही सुरक्षित करून टाकत असतो. मात्र या आयत्या वेळी केलेल्या उपाययोजना आपल्याला ‘अर्थसाक्षरते’ची पदवी देण्यासाठी नक्कीच पुरेशा नाहीत. अशा वरवरच्या उपाययोजनांना फारतर ‘अर्धसाक्षरता’ म्हणता येईल.

आपण आर्थिक साक्षर होणं म्हणजे आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ घालून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आणि कुवतीनुसार जोखीम घेऊन चांगला परतावा मिळवणं. यातही ‘उत्पन्न – खर्च = बचत’ हे समीकरण बदलत उत्पन्नानुसार आधी बचतीची शिस्त लावून घेत उरलेल्या पैशांतून खर्च भागवणं आवश्यक असतं. अर्थसाक्षरतेमध्ये आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे म्हणजेच घर, मुलांची शिक्षणं, त्यांची लग्न, चारचाकी गाडी, परदेशी सहली अशा भविष्यातल्या घडामोडी विचारात घेऊन दीर्घकालीन नियोजन करणं अपेक्षित असतं.

आर्थिक गुंतवणूक आणि गुंतवणुकीतली जोखीम या मुद्द्यांचा विचार करण्याआधी आपण स्वतःच्या आयुष्याची योग्य आर्थिक जोखीम उचलली आहे (लाईफ कव्हर) का, तसंच संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा घेतला आहे का, हे दोन मुद्दे तितकेच महत्त्वाचे ठरतात. एखादी दोन-पाच लाखांची विमा पॉलिसी आपल्या पश्चात आपल्या कुटुंबीयांसाठी पुरेशी आहे का, तसंच आरोग्यविषयक एखादा मोठा खर्च अचानक उभा ठाकल्यास त्या दृष्टीनं आपली तयारी आहे का, या दोन्ही प्रश्नांवर ‘टर्म इन्शुरन्स’ आणि ‘मेडिक्लेम’ हे सक्षम उपाय ठरतात.

चला, तर मग आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीनं पहिलं महत्त्वाचं पाऊल उचलूया आणि खर्यार अर्थानं आपलं आणि आपल्या कुटुंबाचं भवितव्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि उज्ज्वल करूया.

तुमचा आर्थिक सल्लागार आहे का? 

मी बँकेचे सर्व व्यवहार चोख सांभाळतो, शेअर्स-म्युच्युअल फंडाची मला जाण आहे. असं असताना काय गरज आहे आर्थिक सल्लागाराची, असा बहुतेक सुशिक्षित लोकांचा सवाल असतो. पण आजारी पडल्यावर थेट मेडिकल स्टोअरमधून मनानं कोणतीही औषधं घेण्यापेक्षा ज्याप्रमाणे आपण आधी डॉक्टरांना गाठतो, अगदी तशीच भूमिका आयुष्याच्या आर्थिक नियोजनात आर्थिक सल्लागार बजावत असतो. त्यामुळेच मनाला वाटेल तशी गुंतवणूक करण्यापेक्षा सल्लागाराच्या अनुभवी सल्ल्यानं केल्यास त्याचा भविष्यात उत्तम परतावा मिळेल, हे नक्की!


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

kishor on 30 Nov 2022 , 8:53PM

👌👌👌🙏

ashok p lodha on 07 Mar 2019 , 2:37PM

👍

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...