सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कोरोना लॉकडाउन आणि छोट्या उद्योजकांचे आर्थिक जीवन - भाग १ गेल्या आठवड्यापासून कोरोना मुळे सारे जग स्तब्ध आहे. २१ दिवस सारे ठप्प

26 Mar 2020 By श्री. महेश चव्हाण
2449 17 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

गेल्या आठवड्यापासून कोरोना मुळे सारे जग स्तब्ध आहे. २१ दिवस सारे ठप्प पण कामगारांचे पगार, भाडे हे सर्व कसे मॅनेज करायचे या संदर्भात काही जणांनी प्रश्न विचारले "सर कसे मॅनेज करायचे काही सुचत नाही" त्या साऱ्यांसाठी हा लेख.

सुरुवात स्वतः पासून स्वतःच्या घरखर्चा पासून करूया.... जसे कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रथम स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे त्याप्रमाणे आपण आपले उत्पन्न आणि खर्च याचा ताळेबंद बांधणे गरजेचे आहे. 

या लॉकडाउन मध्ये मिळालेल्या वेळात आपण आपल्या परिवाराचा या आर्थिक वर्ष्यातील ताळेबंद काढुया जेणेकरून लॉकडाउन नंतर सर्व सुरळीतपणे सुरू होईल तेव्हा तुमच्या हातात जबरदस्त इनपुट असतील जे तुम्हाला पुढील वर्षभरात निर्णय घेण्यासाठी मदत करतील.

१. तुमचे सर्व पर्सनल फॅमिली खर्च लिहून काढा.

२. आपल्याकडे येणारे उत्पन्नाचा आढावा घ्या... वाईटात वाईट किती उत्पन्न येऊ शकते ते काढा.

३. यातील कोणते कोणते खर्च तुम्ही टाळणार आहात ते कट करून टाका (लक्षात घ्या आणि बाणी च्या काळात सरकार ही त्यांचे प्रोजेक्ट पुढे ढकलते. आपल्याला ही आपल्या खर्चावर नियंत्रन आणणे गरजेचे आहे.)

४. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ लागतोय का पहा (उत्पन्न कमी आणि अत्यावश्यक खर्च जास्त असतील तर टेन्शन नका घेऊ आज फक्त आपल्याला आकडे जाणून घायचे आहेत)

५. हे खर्च मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक या मध्ये विभागा.

६. समजा तुमचे उत्पन्न ५०००० आहे आणि खर्च ६०००० आहे म्हणजे काय तर १०००० रुपये तुम्हाला उभे करावे लागतील.

७. आता या कोरोना लॉकडाउन मुळे लगेच उत्पन्न वाढेल याची काही शास्वती नाही तर आपण आपल्या आधीच्या गुंतवणूक तात्पुरत्या स्वरूपात त्यातून पैसे काढून घेऊ शकतो. किंवा खूपच अडचण असेल तर छोट्या कालावधी साठी गोल्ड लोन च्या माध्यमातून पुढील ६ महिन्यासाठी ६०००० उभे करू शकता.

८. हे करताना लक्षात घ्या हे पैसे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात घेत आहात आणि ठराविक कालांतराने ते फेडणार आहात.

९. वरील पायऱ्या पाहून काही जण बोलतील कर्जे काढण्याचा पर्याय चुकीचा आहे तर त्यासाठी हे कर्जे ठराविक कालावधी साठी तुम्ही काढायचे आहे. 

१०. डोके शांत असेल तर उत्पन्न वाढीसाठी तुम्ही काय करू शकता यावर तुम्ही जोमाने काम करू शकता.


विचार कसला करताय एक वही घ्या आणि एक पेन घ्या.... लागा कामाला आणि वरील पायऱ्या नुसार आपल्या परिवाराचा ताळेबंद काढा. लवकरच मी तुमच्या उद्योगाचा ताळेबंद यावर लेख पोस्ट करणार आहे. तेव्हा जर तुमचा परिवाराचा ताळेबंद तयार असेल तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल.

या लॉकडाऊन ला Respond करूया React करून स्वतःला त्रास करून घेऊन काहीच फायदा नाही आहे.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

shaiyad on 05 Jul 2022 , 11:30AM

s

kiran on 26 Sep 2021 , 4:41AM

अगदी बरोबर सर,निश्चितच हा लेख सर्व समान्यांकरिता लाभदायक ठरेल- धन्यवाद

Avinash manohar pokale ( pati ) on 17 May 2020 , 7:21PM

chan sir

shamkant bagul on 11 May 2020 , 2:34PM

चांगली माहिती दिली सर.👌

Suiata Kirve on 03 May 2020 , 5:24PM

Good information and good thought

VIJAY on 01 May 2020 , 4:09AM

खूप छान

Bharat Landge on 28 Apr 2020 , 5:41PM

khupach mast mahiti sangitli ahe

Avinash manohar pokale ( pati ) on 21 Apr 2020 , 1:13PM

sir khup chan mahiti

prachi jogdankar on 17 Apr 2020 , 6:54AM

good sir

mukesh on 08 Apr 2020 , 11:37PM

very nice Sir..

Atul Suryawanshi on 08 Apr 2020 , 8:56PM

khup chan post aahe.

Praful S.Pote on 04 Apr 2020 , 8:47AM

balance sheet asli li ki kharch kami hoto sir me sir saving la start kel RD 2000 rs ek MF 2000rs kadhat aahe thanks sir

PRAVINA PILLE on 03 Apr 2020 , 3:17PM

सर, खरंच आता जमाखर्च हा हिशेब ठेवणे हे जास्त सोयीस्कर

योगेश प्रभाकर on 02 Apr 2020 , 10:51PM

छान माहिती दिली आहे....

bhushan p. mali on 01 Apr 2020 , 7:24PM

कोरोना मुळे कोणत्या प्रकारे प्रभाव पडला आहे

Sachin ghatage on 31 Mar 2020 , 1:01AM

Yes sir good

Ramesh Ramugade on 28 Mar 2020 , 8:59AM

Good sir

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...