सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Diversification : वॉरेन बफेट चा मोलाचा सल्ला Don’t keep all eggs in single basket. असे वॉरेन बफेट न गुंतवणूकीच्या ब

20 Nov 2018 By श्री. महेश चव्हाण
940 0 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

"Don’t keep all eggs in single basket" असे वॉरेन बफेट न गुंतवणूकीच्या बाबतीत म्हंटलेलं आहे. याच अर्थ समजून घेणं प्रत्येक गुंतवणूकदारासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अन्यथा गुंतवणूक करणे हा एक धोका बनू शकतो. "Don’t keep all eggs in single basket" किंवा "Keep eggs in every basket" म्हणजे काय ते पाहू या. 

एकाच प्रकारात सर्व गुंतवणूक करु नका. म्हणजे जीवनातील सर्व प्रकारच्या आर्थिक प्रश्नांचे समाधान करु शकेल असा कोणताही एक गुंतवणूक प्रकार नाही. एकाच प्रकारात आर्थिक गुंतवणूक करण्याऐवजी प्रत्येक प्रकारच्या आर्थिक साधनामध्ये गुंतवणूक करणे हितावह ठरते.

वेगवेगळ्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे गुंतवणूकीचे मार्ग निवडले पाहिजेत. आपण याआधीच्या लेखामध्ये सुरक्षा, तरलता व परतावा (Safety, Liquidity & Returns) याबाबत जाणून घेतले. आता त्याला धरुन पुढे वाटचाल करण्याची पध्दती जाणून घेऊ या.

एसआयपी सारख्या चांगल्या परतावा (Highest Returns) देणाऱ्या योजनेत पैसे गुंतवताना त्याला लागणारा वेळ व धरावा लागणारा संयम अतिशय महत्त्वाचा असतो. आज एसआयपी सुरु केली की लगेच वर्षभरात मोठ्या परताव्याची अपेक्षा धरणे कदाचित दिवास्वप्न ठरेल. काही वेळा एसआयपीत सहा महिन्यात सुध्दा चांगले रिटर्नस मिळू शकतील. मात्र ते प्रत्येक वेळा मिळतीलच असेही नाही. किंवा प्रत्येक वेळी मिळणारच नाहीत असेही नाही. कारण एसआयपी मध्ये सुरक्षा व तरलता कमी असली तरी परतावा जास्त असतो. त्यामुळे त्याची जोखीम सुध्दा जास्त असते. उठसूठ कधीही Emergency मध्ये (तातडीने) लागणाऱ्या पैशासाठी एसआयपी बंद करणे किंवा त्यातून पैसे काढून घेणे. म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे ठरेल. एसआयपी मध्ये जोखीम जास्त व परतावा मिळण्याची वेळ अनिश्चित असल्याने यामध्ये पुढील गोष्टीचा अभ्यास करुन पैसे गुंतवणे गरजेचे आहे. ज्या पैशाची आपल्याला सध्या गरज नाही. किंवा जे पैसे गुंतवल्यास आपल्या चालू जीवनावर त्याचा काहीही फरक पडणार नाही असे पैसे एसआयपी किंवा तत्सम जास्त परतावा देणाऱ्या तसेच अनिश्चित वेळाने परतावा मिळणाऱ्या साधनामध्ये गुंतवावेत.

सुरक्षा हा घटक लक्षात घेऊन काही गुंतवणूक करणे गरजेचे आहे. दरमहा कुटुंबासाठी लागणारा किमान खर्च हा टाळता येत नाही तसेच तो थांबवता सुध्दा येत नाही किंवा त्याला इतर कोणताही पर्याय नाही. त्याची तजवीज करण्यासाठी उत्पन्नाचे काही स्रोत शोधून ठेवले पाहिजेत. मग ते उत्पन्न नोकरीतून येणारे (Active Income) असो की काम न करता येणाऱ्या एखाद्या स्रोतातून (Passive Income) असो. एखादे घर / फ्लॅट भाड्याने दिल्यावर दरमहा ठराविक रक्कम मिळते. याशिवाय Fixed Deposit मधून मिळणारे दरमहा व्याजसुध्दा सुरक्षित असते. अशा वेगवेगळ्या Active आणि Passive उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा दरमहा लागणारा किमान खर्च भागवून उरणारी रक्कम शेअर बाजारात गुंतवणे अतिशय फायदेशीर ठरते.

जे पैसे आपण कमावेलच नाहीत किंवा आपले नाहीतच असे समजून शेअर बाजारात मोठ्या कालावधीसाठी गुंतवल्यास त्यातून मिळणारा लाभ हा अविश्वसनीय असतो. पाठीमागच्या काही लेखामध्ये कुणीतरी एक प्रश्न विचारला होता. की गोदरेज सारखा जॅकपॉट कसा लागतो. त्याचे उत्तर आता आपण जाणून घेऊ या. गोदरेज सारखा जॅकपॉट म्हणजे काय ते आधी समजून घेणे गरजेचे आहे. इन्फोसिस सुरु करताना केलेल्या 10 हजाराच्या गुंतवणूकीचे अलिकडच्या काळात काही हजार करोड मध्ये रुपांतर झाले कारण इन्फोसिस कंपनीचा वृध्दीदर हा फार वेगवान होता. काही हजाराचे काही हजार करोड होणे म्हणजे जॅकपॉटच म्हणावे लागेल. असेच अनेक कंपन्याचे जॅकपॉटचे उदाहरण दिले जाते. अर्थात ही सर्व उदाहरणे सत्यसुध्दा आहेत.

मात्र आपला यात सहभाग कसा नोंदवला जाईल व आपल्याला हा प्रत्यक्ष फायदा कसा मिळेल हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुराणातील वांगी पुराणातच ही म्हण आपल्याला लागू पडेल. सगळ्यात आधी हे जाणून घेणे गरजेचे आहे. गोदरेज मध्ये 1980 च्या दशकात ज्यांनी पैसे गुंतवले त्यांना 2010 च्या दशकात चांगला नफा व परतावा मिळाला आहे. याचा अर्थ त्यांना पैसे गुंतवल्यावंतर जवळजवळ 30 वर्षे वाट पाहावी लागली आहे. एवढे दिवस वाट पाहण्याची आपली तयारी आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेतल्यास आपल्याला सुध्दा हा जॅकपॉट लागण्याची शक्यता निर्माण होते. असे कोणते प्रश्न आहेत. त्याची उत्तरे काय याबाबत अधिक माहिती पुढील लेखात जाणून घेऊ. तोपर्यंत विचार चालू राहू द्या.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...