सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नवीन व्यवसाय किंवा उद्योग करणाऱ्या आपल्या मराठी नव उद्योजकांसाठी.... नोकरी मध्ये रस राहिलेला नाही किंवा त्यातून आपल्या परिवारासाठी आर्थिक ग

12 Oct 2021 By श्री. महेश चव्हाण
2541 2 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

नोकरी मध्ये रस राहिलेला नाही किंवा त्यातून आपल्या परिवारासाठी आर्थिक गरजा आपण भागवू शकत नाही म्हणून आता आपले बहुतेक मराठी बांधव उद्योगात येत आहे त्यांच्यासाठी महत्वाचे.....

उद्योग सुरू करताना त्यासाठी लागणारी सेट अप कॉस्ट आणि तिथून पुढे ३ वर्षांच्या महिन्याचा खर्चचा ताळेबंद आखा.

उद्योगासाठी पैसा उभारताना ३ वर्षेचा ताळेबंद डोक्यात ठेवा....खूप जण झटपट व्यवसायात उतरण्याची घाई करतात आणि मग सेट अप टाकल्यावर महिन्याच्या खर्च जसे कि....

🏭 दुकानाचे भाडे
👷🏻‍ स्टाफ चा पगार
🥡 धंद्यातील माल
⛽ इलेक्ट्रिक बिल


असे मासिक खर्च हाताळताना बेजार होऊन जातात.... यासाठीच तुम्ही किती जरी चांगले प्रॉडक्ट्स किंवा सेवा देत असाल पण जर तुमच्याकडे पैश्याचे व्यवस्थापन नसेल तर तुमचा व्यवसाय पहिल्या १-२ वर्ष्यात बंद पडेल.... हो हे मी नाही सांगत आहे तर जगभरातील ७०-८०% व्यवसाय पैश्याचे व्यवस्थापन नीट नसल्याने पहिल्या एका वर्षात बंद पडतात.

जास्तीत जास्त मध्यमवर्गीय मराठी परिवाराने व्यवसायात यावे पण तो उभा करताना भावनिक न होता ३ वर्ष्याचे नियोजन करून उतरावे.... तसेच आपल्या परिवाराच्या म्हणजे घरखर्च, मुलांचे शिक्षण याची ही तरतूद करून योग्य नियोजन करून उतरलेले कधीही योग्यच. कारण व्यवसाय हा पैश्यावर चालतो भावनेवर नाही.... व्यवसाय चालू करण्यास थोडा विलंब लागला तरी चालेल पण घाई करून चक्रव्यूहात अडकू नका.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

Avinash patil on 15 Mar 2023 , 8:45PM

working on it ..

VINIT.MISHRA on 27 May 2022 , 10:47PM

Kartika ENTERPRISE

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...