सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

म्युच्युअल फंड SIP (गुंतवणुकीचा एक पद्धतशीर मार्ग) गेल्या ५-१० वर्षामध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांच्या जाहिरातीमुळे SIP हा

28 Nov 2018 By श्री. महेश चव्हाण
1696 29 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

गेल्या ५-१० वर्षामध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांच्या जाहिरातीमुळे SIP हा गुंतवणूक पर्याय घराघरात पोहचला आहे. त्याबद्दल म्युच्युअल फंड कंपन्या, गुंतवणुवकी विषयक मासिके, वर्तमानपत्रे यांचे आभार मानावे तितके कमी कारण, भारतीय लोकांना त्यांच्या पारंपरिक मानसिकतेतून बाहेर काढून शेअर बाजारातील म्युच्युअल फंड सारख्या गुंतवणुकीकडे वळवणे तेवढे सोपे नाही पण आज कुठे तरी मोठा बदल होताना दिसतोय.

आज SIP करायची आहे म्हणून खूप ग्राहक बाजारात येतात, गुंतवणूक करतात पण अजून त्यांना...
 
• SIP म्हणजे नक्की काय ? 
• म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय ?
• म्युच्युअल फंड किंवा SIP कशी काम करते ?
• SIP हे गुंतवणुकीचे प्रॉडक्ट नाही तर गुंतवणुकीची पद्धत आहे.


अशा गोष्टींबद्दल काहीच माहिती नसते, तेव्हा लक्षात येते की इथे सुद्धा गुंतवणूकदारांची मानसिकता ही इतर गुंतवणूकीसारखीच आहे. मी जेव्हा विचारतो तुम्हाला SIP का करायची आहे तर कारणे मिळतात.... माझे सहकारी करतात, माझा भाऊ करतो, माझे सर्व मित्र करतात म्हणून मला पण सुरुवात करायची आहे. म्हणजेच काय एक संपत्ती निर्माण करण्याचा हमखास मार्ग आज तुमच्याकडे आहे पण तुम्हाला त्याची ताकद माहित नाही ही शोकांतिका आहे. हो की नाही ? आज अल्लादिनचा चिराग आपल्याला मिळाला तर आपण काय काय मागू ? तसेच या म्युच्युअल फंड : SIP च्या माध्यमातून तुम्ही खूप काही मिळवू शकता फक्त तुम्हाला या गुंतवणूक पर्यायाची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. मागे आपण म्युच्युअल फंडाचे प्रकार पहिले आज आपण म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीचा SIP ही पद्धत पाहूया.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या प्रकारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही पद्धती आहेत जसे की... 

1. Lumpsum Investment 
2. Systematic Investment Plan 
3. Systematic Withdrawal Plan
4. Systematic Transfer Plan 


वरील ४ पद्धतीने आपल्या सोयीनुसार आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. यातील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे ‘म्युच्युअल फंड : SIP’ आणि आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Systematic Invesment Plan म्हणजे नक्की काय?

Systematic Invesment Plan म्हणजे ज्याप्रमाणे आपण बँकेत किंवा पोस्ट मध्ये दरमहिन्याला RD अकाउंटला पैसे भरतो आणि ती छोटीशी रक्कम पुढच्या ५-१० वर्षात एक मोठी रक्कम होते. त्याचप्रमाणे Systematic Invesment Plan (SIP) नुसार दरमहिन्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली जाते. फरक इतकाच की, ही ऑटोमेटेड सिस्टिम आहे आणि आतापर्यंत आपण दरमहिन्याला ज्या गुंतवणूक करत आलो त्या सर्व आपण स्वतः बँकेत किंवा पोस्टात जाऊन कराव्या लागत होत्या त्या गुंतवणुकीमध्ये काही त्रुटी राहत होत्या, त्या या म्युच्युअल फंडच्या SIP मध्ये भरून काढल्या आहेत.

म्युच्युअल फंड SIP करण्याची प्रक्रिया कशी असते ते पाहूया...

1. महिन्याला किती रक्कम आपण गुंतवू इच्छितो ते ठरवणे 
2. म्युच्युअल फंड कंपनी आणि स्कीम निवडणे 
3. महिन्याच्या कोणत्या तारखेला बँकेतून पैसे SIP साठी जाणार ती तारीख ठरवणे 
4. किती कालावधीसाठी आपण गुंतवणूक करणार आहोत ते ठरवणे 
5. म्युच्युअल फंड SIP फॉर्म भरणे

अशा प्रकारे म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणुकीचा आपण श्रीगणेशा आपण करू शकतो. या म्युच्युअल फंड SIP ची काही वैशिष्ट्ये आपण बघूयात.

1. गुंतवणुकीला शिस्त आणते :- दर महिन्याला डायरेक्ट बँक अकाउंट मधून SIP साठी रक्कम वजा होत असल्यामुळे गुंतवणुकीला एक शिस्त प्राप्त होते.

2. चक्रवाढ व्याजाची शक्ती : जितका जास्त वेळ तुम्ही द्याल तितके जास्त तुम्ही मिळवलं. एखाद्या ३० वर्षीय व्यक्तीने त्याच्या वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत पर्यंत दर महिन्याला १०००० रुपये गुंतवणूक केली तर पुढील ३० वर्षात १५% जरी परतावा मिळाला तर त्याचे ३६ लाख गुंतवणुकीचे ७ कोटी होतील. ही चक्रवाढ व्याजाची शक्ती आहे.

3. सुलभता :- SIP मध्ये तुम्ही महिन्याला ५००-१००० रुपये पासून गुंतवणूक सुरुवात करू शकता. ज्यामुळे तुमच्या महिन्याच्या बजेटवर मोठा परिणाम होत नाही.

4. रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग :- हे एक गुंतवणुकीचे तंत्र आहे. मार्केट मध्ये तेजी-मंदीचा फायदा या तंत्रामध्ये होतो. मार्केट खाली असल्यास जास्त युनिट खरेदी करता येतात कारण त्यामुळे भाव तुटलेले असतात.

5. प्रत्येक वेळ योग्य वेळ :- शेअर बाजारात काही ‘अति स्मार्ट गुंतणूकदार’ शेअर बाजाराच्या चढ-उतारावचे निरीक्षण करून कार्य पैसे गुंतवत असतात. जे अजून स्वतः वॉरेन बफेट सरांनासुद्धा जमले नाही. SIP पर्यायामध्ये हा विषयच राहत नाही कारण मार्केट मध्ये तेजी असो किंवा मंदी, गुंतवणूक होत राहते.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा आणि त्यातून आपली आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंड : SIP हा एक उत्तम मार्ग आहे. इथे आपल्याला फक्त आपल्या क्षमतेनुसार महिन्याची रक्कम ठरवायची आहे आणि ती वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपनीच्या स्कीम मध्ये गुंतवणूक करून त्यावर निरीक्षण ठेवायचे आहे. लक्षात ठेवा कोणत्या तरी जॅकपॉट शेअर्सच्या शोधात निघण्यापेक्षा महिन्याला ५०००-१०००० ची गुंतवणूक म्युच्युअल फंड : SIP मध्ये चालू करा दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणार असाल तर १५-१६% हमखास परतावा मिळू शकतो. जेणेकरून तुम्ही महागाईला तोंड देऊ शकाल. 


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

Nandkishor Dhore on 04 Jan 2022 , 2:58PM

very nice

Laxman shinde on 23 Nov 2021 , 11:58AM

खूप छान माहिती दिली.

Suhas on 20 Apr 2021 , 11:01AM

Very informative about SIP

Suhas on 20 Apr 2021 , 11:01AM

Very informative about SIP

Suhas on 20 Apr 2021 , 11:01AM

Very informative about SIP

Suhas on 20 Apr 2021 , 11:01AM

Very informative about SIP

योगेश प्रभाकर on 27 Apr 2020 , 5:57PM

😅😅 खूपच सुंदर माहिती दिली आहे.....

aniket c dalvi on 09 Feb 2020 , 8:20PM

mala saanga jar me 1000rs.chi s.i.p keli tar mala5varshat kiti partava milel?

Sandeep on 08 Mar 2019 , 2:10PM

Thank you nice information

Bhushan on 19 Feb 2019 , 4:48PM

After all these information now I decided to close fixed deposits,

Dattatray Nalage on 16 Jan 2019 , 7:56PM

खुप छान माहिती

Mahesh Chavan on 16 Jan 2019 , 11:20AM

सर्वांचे आभार....मराठी पैसा....ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा....मोबाईल अँप आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्हाला मदत करा.

गणेश on 15 Jan 2019 , 8:25PM

sir मला sipकरायची आहे त्याबद्दल सांगा कोणाकडे करू

rajaram on 14 Jan 2019 , 4:49PM

nice

Rohan Ghorpade on 14 Jan 2019 , 12:00AM

khuoach chan lekh ahe sir.

suresh yashwant patil on 09 Jan 2019 , 2:03PM

छान व मुद्देसुद्ध मांडणी..👌

prachi botre on 05 Jan 2019 , 2:30PM

khup chhan

Mahesh Chavan on 24 Dec 2018 , 12:39PM

LIC हे विमा आणि गुंतवणूक प्रकारात येते तर मुतुअल फंड sip हा संपूर्ण गुंतवणूक प्रकारात येते....गुंतवणूकदाराने स्वतःच्या भविष्यातील ध्येयानुसार गुंतवणूक करावी.....परतावा च्या दृष्टीने पहाल तर Equity MF SIP ७-१० वर्ष्यापर्यंत केलेली कधीही चांगली.

iqbal Innus Attar on 23 Dec 2018 , 9:29PM

Lic sip changali ka muchal fand

mahesh prakash patil on 19 Dec 2018 , 8:46PM

Good information...

Mahesh Chavan on 18 Dec 2018 , 11:47PM

सर्वांचे धन्यवाद

rakesh pandey on 14 Dec 2018 , 9:30PM

nice sir

RAKESH KOTHAWADE on 12 Dec 2018 , 8:10PM

nice info

adesh on 11 Dec 2018 , 9:07PM

खूप छान लेख

गोविंद सिताराम परब on 08 Dec 2018 , 8:26AM

खूप छान माहिती दिली आहे

श्यामकांत निम्बादास खैरनार on 06 Dec 2018 , 3:45PM

chhan,S I P केल्या मुळे निश्चित च 10 वर्ष पेक्षा जास्त पैसे ठेवले तर फायदा नक्की आहे,

दीपक माणिक पाटील on 06 Dec 2018 , 9:21AM

sip करण्या पेक्षा lumsum amount मार्केट खाली असताना गुंतवणूक करणे योग्य आहे का

Ajay Jawanjal on 06 Dec 2018 , 8:41AM

good

Mahendra Nerkar on 05 Dec 2018 , 9:29PM

आपण अगदी सोप्या भाषेत एस आय पी चे महत्त्व समजावून सांगितले सर खुपच छान

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...