सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा योजनांचा भांडा-फोड लेख मालिका भाग :१ कोणत्याही कार्यक्रम किंवा मित्र परिवार किंवा आमचे गुंतवणूकदार यांच्याश

24 Dec 2019 By श्री. महेश चव्हाण
2463 14 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

कोणत्याही कार्यक्रम किंवा मित्र परिवार किंवा आमचे गुंतवणूकदार यांच्याशी जेव्हा बोलणे होते तेव्हा बाजारात चाललेल्या फसव्या योजना बद्दल माहिती मिळते. महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा आणि आपले जीवन आनंदी जगा. आधीच कमाई चे मार्ग कमी आणि खर्च जास्त असलेला मध्यमवर्गीय रिस्क न घेता आपल्या पदरात फायदा कसा पाडून घेता येईल याचा विचार करत असतो आणि मिळणाऱ्या हमखास नफ्याच्या आड बुद्धी गहाण ठेऊन गुंतवणूक करतो. तर जाणून घेऊया या कंपन्या कश्या चालतात आणि पुढे काय होते.

योजनांची संकल्पना : आमची शेअर बाजारात कंपनी आहे आणि आमच्या कडे हमखास नफा कमवायच्या ट्रिक आहेत. ज्याचा वापर करून आम्ही गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून देतो. काही नफा आम्ही स्वतःला ठेवतो काही नफा आम्ही तुम्हाला देतो.

१. सर्व व्यवहार रोख रकमेत केले जातात किंवा कंपनी च्या नावाने चेक घेऊन केले जातात. (सेबी च्या नियमानुसार शेअर बाजारात गुंतवणूक करताना सर्व गुंतवणूक ही डिमॅट अकाउंट मध्ये होणे गरजेचे आहे. इथे सुरुवातच चुकीच्या पद्धतीने होते)

२. तुमच्या डिमॅट मध्ये गुंतवणूक नसल्याने तुम्हाला नफा किती झाला तोटा किती झाला याचा ताळेबंद आखू शकत नाही.

३. १०० रुपयांच्या बॉण्ड पेपर वर जुजबी माहिती आणि अटी लिहून एक 2 पानांचे अग्रीमेंट केले जाते.(गुंतवणूक दारांना हे खूप विश्वसनीय वाटते....कायदयाच्या भाषेत याला शून्य किंमत असते...विश्वास वाटत नसेल तर एखाद्या वकील मित्राला विचारून पहा)

४. कमीतकमी गुंतवणूक ही १ लाखापासून चालू होते.

५. भपेकेदार ऑफिस, टकाटक स्टाफ, आणि मुख्य कंपनीचे भागीदार BMW, Audi मधून सेमिनार घेत गावोगाव भटकत असतात. 

६. तुम्ही शेअर बाजारात नक्की काय करता असे विचारल्यास आम्ही ट्रेडिंग करतो, गुंतवणूक करतो, डॉलर मध्ये ट्रेडिंग करतो, Future & Options मध्ये ट्रेडिंग करतो, (म्हणजे लाथ मारेन तिथे पाणी काढतो)

७. नवीन गुंतवणूकदार आणणाऱ्या व्यक्तीला कमिशन दिले जाते.

सगळ्या फसव्या योजनांमध्ये दिसणारे हे काही पॉईंट्स आहेत. आता या कंपन्या चालतात कश्या तर या कंपन्यांचे दोन प्रकार असतात.

१. ज्यांचे मुख्य ध्येयच लोकांना फसवून मोठा पैसा गोळा करून निघून जायचे आहे.

२. यांचे मुख्य ध्येय फसवणे नसते तर ते स्वतःच फसलेले असतात (शेअर बाजारात घुसलेल्या व्यक्तीला पहिल्या १-२ वर्ष्यातच भरघोस नफा मिळतो त्याला वाटते जर मी माझ्या २-३लाख किंवा ५-१० लाखावर इतके कमावत आहे तर अजून काही लोकांकडून पैसे उभे करून डबल नफा कमावू शकतो) यातूनच वरील संकल्पनेचा उदय होतो.

- शेअर बाजार हे एकेरी रेषेत पैसा देणारे साधन नाही आहे तरी दर महिन्याला हमखास नफा हे कसे देतात?
कारण सर्व पैसा कंपनीच्या एका अकाऊंट ला असतो जिथे साऱ्या गुंतवणूक दाराचे पैसे असतात त्यात दर महिन्याला नवीन गुंतवणूक दारांचा भरणा चालूच असतो.

- तुम्हाला नक्की नफा मिळतोय की तुमच्या मुद्दल मधून तुम्हाला पैसे काढून देत आहेत तुम्हाला कळत नाही. कारण महिन्याला ३-५% म्हणजे वर्ष्याला ३६-६०% नफा हा गुंतवणूक दारांना अजून नफा करून देणारी कंपनीचा नफा समजा १२-१८% पकडला, शेअर बाजारात लागणारे टॅक्स आणि कमिशन पकडले तर ते १२-१५%. म्हणजे सरासरी ६०-८०% दर वर्ष्याला नफा होईल तेव्हाच ही रोलिंग होणे शक्य आहे. आज 
FD मध्ये मिळणारे व्याज ८%. शेअर बाजारात सरासरी मिळणारा परतावा १२-१५% सरारसी कोणत्या व्यवसायात मिळणारा परतावा २५-३०% हे माहिती असून सुद्धा लोक या हमखास परतावा देणाऱ्या कंपन्या मध्ये बुद्धी गहाण ठेऊन पैसा लावतात.

- तोटा झाला तरी तो नवीन गुंतवणूक दारांचे पैसे कंपनीत येत असतात यातून महिन्याला द्यावे लागणाऱ्या पैश्याचा जुगाड केला जातो.

- आता कंपनी रियल इस्टेट किंवा ५-१० नवीन प्रोडक्ट घेऊन येत आहे अशी घोषणा होते यात जुने ग्राहक अजून पैसे गुंतवतात.

- सुरुवातीला तारखेला पैसे न चुकता न मागता क्रेडिट केले जातात. ६-७ महिने हमखास पैसे मिळाल्यावर गुंतवणूक दारांची हाव वाढते. १ लाखाला ५००० म्हणजे वर्ष्याला ६०००० अजून १ लाख टाकले की महिन्याला १२००० म्हणजे एक पगार घरी आल्यासारखे.

- एका बाजूला दर महिन्याला ५-६% नफा देणे परवडत नसेते तर दुसऱ्या बाजूला गुंतवणूक खोऱ्याने लाईन लावून पैसे गुंतवायला उभे असतात.

- पहिल्या प्रकारच्या कंपनीचे एक पैसा उभा करायचे टार्गेट असते ठराविक रक्कम गोळा झाली कि बोजा गुंडाळून हे रातोरात निघून जातात.

- दुसऱ्या प्रकारच्या कंपनीचे भागीदार त्यांना स्वतःची चूक कळत असते पण आता माघार नसते काही जण यात ही अति आत्मविश्वास दाखवून घर जमीन यावर कर्जे काढून कशी तरी कंपनी चालू ठेवतात पण एक दिवस येतो तेव्हा सर्व बंद होते.

क्रमशः


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

Varsha p borule on 17 Sep 2020 , 9:57PM

v good

sujut on 23 Jul 2020 , 12:15PM

1 no..khup chan

Rohini on 06 Apr 2020 , 1:27PM

लेख आवडला, हीच खरी वस्तुस्थिती आहे👌👍

atul on 26 Feb 2020 , 8:40AM

खूप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद

Shivaji A. Chavan on 14 Jan 2020 , 11:40AM

छान माहिती आहे सर

vishwas on 11 Jan 2020 , 4:21PM

apratim lekh

manik patil on 04 Jan 2020 , 8:49PM

khupach chhan mahiti

योगेश प्रभाकर on 01 Jan 2020 , 4:02PM

खूपच सुंदर माहिती दिली आहे....... खेडेगावात असे प्रकार खूप चालतात....

Monika Pingale on 31 Dec 2019 , 7:18PM

Nice Article.

shubhangi jitendra deshmukh on 31 Dec 2019 , 11:53AM

khup chan mahiti

amit malkar on 28 Dec 2019 , 4:22PM

app download केला रे....छान बनवला आहेस....

sandeep on 24 Dec 2019 , 3:33PM

keep it up sir....this one nice article

Dinesh Raghunath Kothawade on 24 Dec 2019 , 11:08AM

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.

Prakash on 24 Dec 2019 , 10:35AM

barobar aahe

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...