शेअर बाजारां बद्दल मराठी माणूस नाही तर गुजराती मारवाडी समाज सोडल्यास संपूर्ण भारतात शेअर बाजार म्हणजे जुगार ही मानसिकता आहे. मित्राच्या, काकाच्या, मामाच्या किंवा कोणत्यातरी जवळच्या ओळखीच्या व्यक्तीचा झालेला लॉसच्या कथा सगळीकडे चोळून, रंग टाकून सांगितल्या जातात. त्यामुळे ज्यांना यातले काहीच माहिती नसते अशी लोक लग्न समारंभात, कट्यावर बसून शेअर बाजारच्या नादाला का लागू नये असे पटवून देतात.
कुणाला तरी लॉस झाला हे मान्य...
- पण कसा झाला ?
- का झाला ?
- तो नक्की स्वतः अभ्यास करून करत होता का कुणाच्या एकाच्या सल्ल्याने करत होता ?
याचा कोणीही अभ्यास करत नसतो.
कुणाला तरी नुकसान झाले म्हणजे सर्वांना होणार असे नसते... हे मत म्हणजे असे झाले... कुणाचा तरी पुण्याला जाताना अपघात झाला मग जीवनात कोणी पुण्याला जायचे नाही...
सांगायचे तात्पर्य एकच शेअर बाजारात यशस्वी होण्याच्या कथा तूर्तास तरी कमी आहेत पण भारतीय शेअर बाजार परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून बऱ्या पैकी लोक आज गुंतवणूक करत आहेत.
जगातील श्रीमंत गुंतवणूकदार वॉरेन बुफ्फेट सर म्हणतात त्याप्रमाणे...
# जिथे लोक वेड्यासारखा पैसा खर्च करतात अश्या कंपन्यांचा अभ्यास करा.
# त्यांचा मालक रतन टाटा आहे की विजय मल्ल्या कॅटेगरी मध्ये आहे ते तपासा.
बाजारातील काही ओळखीच्या आणि यशस्वी कंपन्या....
१. ब्रिटानिया : आतापर्यंत आपण या कंपनीची किती बिस्किटे खाली ?
२. बजाज फायनान्स : आजकाल १० पैकी ३ उपकरणे बजाज फायनान्स च्या EMI वर घेतली जातात शेअर ची गेल्या 5 वर्षांतील किंमत बघा चक्कर येईल.
३. मारुती सुझुकी : भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनी
४. Nestle India : Cerelac पासून मगी पर्यंत प्रोडक्ट विकणारी कंपनी.
५. पेज इंडस्ट्रीज : जॉकी Clothing अग्रगण्य कंपनी ची पेज इंडस्ट्रीज कडे भारतीय बाजाराचे सर्व हकक आहेत.
वरील कंपन्या या त्या त्या क्षेत्रातील चांगल्या कंपन्या आहेत यात अभ्यास करून गुंतवणूक केल्यास आणि ज्याप्रणे आपण FD, Real Estate मध्ये ज्या प्रमाणे गुंतवतो आणि संयम ठेवतो त्याचप्रमाणें इथे जर ठेवला तर शेअर बाजार तुम्हाला संपत्तीची दरवाजे खोलू शकतो. गरज आहे स्वतः शिकण्याची.
टीप :
सुरुवात म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून करा. घाई करून लगेच डिमॅट अकाउंट ओपन करून ट्रेडिंग करण्याच्या फंदात पडू नका.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "
मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa