श्री. महेश चव्हाण
आपल्या आई- वडिलांनी त्यांना जे काही मिळाले नाही ते आपल्याला कसे मिळेल यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य पणाला लावले हो ना? आपण हि आपल्या मुलांसाठी हेच करतोय हे पण तितकेच खरे. आमच्याकडे आर्थिक नियोजनाकडे येणारे ९०% परिवार आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप चिंतीत असतात आणि त्याच बरोबर स्वतः वाटेल तो त्रास सहन करून, स्वतःच्या आवडी-निवडीला मुरड घालून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन करत असतात.
२०१७ या आर्थिक वर्ष्याच्या कर नियोजनच्या निमित्ताने ऑफिस मध्ये ग्राहकांच्या भेटी-चालू होत्या. आमचे एक चांगले ग्राहक श्री. राणे (नाव बदलेले आहे) यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये एका गंभीर विषयाकडे वळण्यास मला भाग पाडले. एका परिवाराचा आर्थिक नियोजनकार म्हणून स्वतःवर किती मोठी जबाबदारी आहे हे त्यातून कळले. आणि आज तो विषय तुमच्यासमोर मांडतोय.
श्री. राणे एक धार्मिक गृहस्थ वयाच्या १८ व्या वर्षी कोकणातून नोकरीच्या निमित्ताने मुंबईत नातेवाईकाकांडे आले. सुरवातीला भेटेल ते काम करत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. छोट्या पतसंस्थेत हिशेबनीस म्हणून सुरु झालेला प्रवास आज २२ वर्ष्यात स्वतःची टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालका बनण्या पर्यंत येऊन पोहचला. २२ वर्ष्यापुर्वी नातेवाईकाच्या बळावर मुंबईत पाय ठेवलेल्या राणेंनी आज सौ. राणे ज्या एका सरकारी बँकेत क्लार्क म्हणून काम करतात यांच्या साथीने मुंबई मध्ये स्वतःचे घर, गावात टुमदार घर , स्वतःचे छोटे कार्यालय आणि त्यात स्वतःचा व्यवसाय इतक्या गोष्टी उभ्या केल्या. मोठी मुलगी आता SSC ला आणि लहान चिरंजीव ७ व्य इयत्तेत दोघेही इंटरनॅशनल स्कूल मध्ये.
वरील सर्व वाचून एक सुखी कुटुंब अशीच व्याख्या होऊ शकते हो ना? हो तसेच आहे पण श्री. आणि सौ. राणे आज एकाच गोष्टीने व्यथित आहेत ते म्हणजे मुलांसाठी इतके केले आहे पण त्यांना यांची जाणीवच नाही आहे. दोघांनी पै-पै जोडून गेल्या १५ वर्ष्यात दोघांनी आपल्या आर्थिक परिस्तिथीला एक योग्य आकार देत मुलांना जे पाहिजे ते देण्याच्या प्रयत्नात त्यांना पैश्याची किंमत किंवा त्याचे मोल समजाऊ शकले नाही त्यामुळे...
- मुलांचा आजचा खर्च करण्याचा वेग
- किंमती वस्तूचा वाटेल तसा वापर
- सतत जे आपलीकडे नाही त्याबद्दल कुरबुर करणे
- जे आई-वडील देत आहेत त्यामध्ये हि समाधानी नाहीत
या गोष्टीमुळे श्री आणि सौ. राणे दोघे हि चिंतीत होते. श्री. राणे याना मी गेले ५ वर्ष ओळखतोय प्रत्येक गोष्टीत आशावादी असणारा हा गृहस्थ आतापर्यंत खूप अडचणींना सामोरे जाऊन इथपर्यंत आला होता आणि आज अश्या गोष्टीमुळे चिंतीत व्हावे त्यामुळे मला हि काय बोलावे ते कळेना.
हे सर्व सांगून झाल्यावर त्यांचा प्रश्न होता महेश आज महिन्याला आपण योग्य नियोजन करून महिन्याला मुलांसाठी आमच्या दोघासाठी काही गुंतवणूक करतोय. मुलांना आपल्या मुलांना एक चांगली संपत्ती बनवून ठेवावी हि माझी इच्छा बरोबर आहे का ? कारण जर ह्या मुलांना पसिहाची किंमतच काळात नसेल तर याना सहजरित्या मिळालेल्या संपत्तीचे काहीच विशेष वाटणार नाही. आणि यामुळे या संपत्तीचा सदुपयोग होण्यापेक्षा दुरुपयोगच जास्त होईल.
श्री.राणे धार्मिक गृहस्थ होते त्यामुळे पैसा कमी असणे त्रासदायक आहे तसाच अति पैसा हि त्रासदायक हे त्यांना चांगलेच माहित आहे. श्री. राणे यांना धीर देत मी बोललो तुम्ही जे बोलत आहात ते १००% बरोबर आहे पण अजूनहि वेळ गेली नाही जर तुम्ही अर्थ साक्षर झालात तर तुम्ही तुमच्या मुलांनाही अर्थ साक्षर करू शकता. आतापर्यंत तुम्ही मुलांना पैसा कसा कमवायचा किंवा कसा गुंतवायचा हे शिकवलेत का ? नाही ना ? तुम्ही मुलांना देत आलात आणि ते मागत आले आणि वडील आणि आई म्हणजे पैसा मिळणारे किंवा गरज पूर्ण करणारे साधन आणि यातून त्यांची मागण्याची वृत्ती तयार होत गेली ज्या वृत्ती ला तुम्ही कोणत्या परिस्थितीतून आला आहेत किंवा तुम्ही किती तारेवरची कसरत करून पैसा कमवत आहात हे त्यांना जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हे चालूच राहील. त्यांना त्यांची चूक कळाली पण मला कळले माझे काम इथे संपत नाही तर इथून चालू होते. मी त्यांना सांगितले जास्त विचार करू नका आपण पुढ्यच्या भेटीत फक्त या विषयावर मार्ग काढू आणि त्यानुसर पावले उचलू.
तुम्हाला लक्षात येतंय कि असा प्रॉब्लेम आज किती घरात चालू असेल मला वाटते निम्याहून जास्त घरात हो ना? कारण आई-वडील आर्थिक गाडा रेटण्यासाठी दोघे बाहेर पडले आहेत आणि मुलांना वेळ देता न आल्यामुळे पैसा त्याची जागा घेतो आणि हाच पैसा कसा घरात येतो ते त्यांना काळातच नाही.
राणे परिवारासाठी जो आराखडा आम्ही बनवला तोच तुम्ही आजपासून तुमच्या मुलांसाठी वापरू शकता.
- स्मार्ट मनी मॅनेजमेंट तुमच्या मुलांसाठी
- मुलांच्या नावावर बँक अकाउंट ओपन करा. लहानपणापासून त्यांना गिफ्ट किंवा सण समारंभात मिळणारे पैसे त्यामध्ये ठेवा.
- बचत आणि गुंतवणूक यातील फरक मुलांना समजावून सांगा.
- लहान मुलांना बँकेच्या ATM सतत घेऊन जाऊ नका. यातून त्यांची चुकीची समजूत तयार होते कि ATM मध्ये गेलो कि पैसे मिळतात.
- महिन्याला-वर्ष्याला त्यांच्या शिक्षणासाठी होणार खर्च त्यानां कळू द्या.
- घरातील छोटे-मोठे होणारे खर्च त्यांना लिहायला सांगा.
- घरात होणाऱ्या आर्थिक व्यवहारामध्ये मुलांना स्थान द्या. ते निर्णय देऊ शकत नाहीत पण जी चर्चा होईल ती कानावर पडण्याने सुद्धा खूप फरक पडतो.
- घरासाठी / गाडी साठी किंवा शिक्षणासाठी घेतलेली कर्जे याची जाणीव मुलांना करून द्या. त्या कर्जाचे हफ्ते किंवा त्यावरील व्याज किती जाते याची जाणीव करून द्या.
- खूप वेळा मुलांचे मित्र मैत्रीण उच्च-ब्ररुह परिवारातून असतील तर आपलीकडे असलेल्या गोष्टी हि त्यांना खुज्या वाटू लागतात त्यासाठी त्यांना हे पटवून द्या कि या जगात आपल्यापेक्षा हि बिकट परिस्तिथी मध्ये राहणारे परिवार आहेत.
- महिन्यातून एकदा अनाथाश्रम किंवा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलांना मुलांच्या हस्ते मदत करा. याचा परिणाम असा होईल कि तुम्ही जे त्यांना पुरवता ते काही जणांना मिळत नाही हे त्यांना कळेल.
ज्याप्रमाणे आज तुमचा स्मार्ट गुंतवणूकदार होण्याचा प्रवास चालू झाला आहे त्याप्रमाणे मुलांनाहि स्मार्ट करण्याची जबाबदारी तुमची आहे त्यांना म्यूचुअल फंड, शेअर्स याबद्दल वाचायला द्या.
लक्षात घ्या आर्थिक शिक्षण हि आज काळाची गरज आहे आणि त्यापेक्षा आहे त्या आर्थिक परिस्थिती मध्ये आनंदी राहणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पैश्या बद्दल दृष्टिकोन बदल होणे गरजेचे आहे.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "
मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa