सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सामाजिक मापदंड... व्यवसायातील साखळदंड गेल्या आठवड्यात एका तरुण उद्योजक मित्राने मोठे घर बांधण्याचा निर्णय घे

21 Nov 2023 By श्री. महेश चव्हाण
1976 0 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

गेल्या आठवड्यात एका तरुण उद्योजक मित्राने मोठे घर बांधण्याचा निर्णय घेतला परंतु आर्थिकरित्या हा निर्णय योग्य आहे का याबद्दल त्याला थोडे मार्गदर्शन हवे होते. पहिल्या भेटीतच त्याला एकच विचार करायला सांगितला की, हे जर तू केलेस तर व्यवसायावर काय परिणाम होऊ शकतो... मग आपण २ दिवसांनी भेटू... हा उद्योजक माझा जवळचा मित्र असल्याने त्याच्या गरजा त्याची व्यवसायाची आताची परिस्थिती समाजाच्या दृष्टीने घर बांधण्यासाठी १००% नाही तर २००% परफेक्ट आहे... परंतु त्याचे व्यवसायाचे दृष्टीने हा निर्णय साखळ दंड ठरू शकतो याचे त्या मित्राला सर्व अंगाने समजावून सांगितले तेच मुद्दे इथे मांडतो.

छोट्या उद्योजकांनी आपल्या उद्योगाच्या आर्थिक परिस्थितीची किंवा उद्योगातील येत्या काळात करायला लागणाऱ्या आर्थिक तरतुदीची किंवा व्यवसाय वाढीसाठी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाची माहिती परिवाराला वेळोवेळी देणे गरजेचे आहे. खूपदा ही माहिती न दिल्याने समाजातील स्टेटसच्या मापदंड मध्ये अडकण्याची भिती जास्त असते. जसे की...

१. व्यवसायवाढी साठी मोठे शॉप घ्यायचे आहे परंतु याच वेळी पत्नीला २BHK घर घ्यावेसे वाटत आहे.

२. व्यवसायवाढी साठी OD-CC घ्यायची आहे परंतु एका बाजूला माझ्या सर्व मित्राकडे गाडी आहे म्हणून गाडी घ्यावीशी वाटणे.

लक्षात घ्या सामजिक मापदंड समाजाने घालून दिलेले असतात ज्याला काहीही अर्थ नसतो... उद्या तुमच्यावर आर्थिक भार वाढला तर समाज तुमचा आर्थिक भार उचलायला येत नाही... तुमची फॅमिली तुमच्या सुखात किंवा दुःखात सोबत असते त्यामुळे त्यांना तुमच्या आर्थिक परिस्थतीची जाणीव असली तर ते ही तुमच्या निर्णयात साथ देतील. खूपदा आजूबाजूला नोकरी करणारे नातेवाईक किंवा मित्र सरळ रेषेत प्रगती करत असतात याचं क्षणी छोटे उद्योजक व्यवसायामध्ये आपला अजून ब्रेक इव्हन पर्यंत पोहचलेले नसतात. अश्यावेळी व्यवसाय अजून पैसा मागत असतो तर दुसऱ्या बाजूला घर-गाडी-विदेशी ट्रीप अश्या समाजातील मापदंड खुणावू लागतात. यांना योग्यरीत्या हाताळले नाही तर हेच मापदंड व्यवसाय वाढीसाठी साखळदंड होऊन बसतात. व्यवसायातील निर्णय क्षमता अपंग करून टाकतात. यासाठीच घर, गाडी, विदेशी ट्रीप अश्या गोष्टीवर पैसा खर्च करताना गरज की इच्छा याचा सारासार विचार करा. फक्त स्टेटस म्हणून या गोष्टी करताना आपल्या व्यावसायिक जीवनाला अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. 

परवा रात्री जेव्हा आम्ही दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा या तरुण उद्योजक मित्राने सारासार विचार करून घर बांधण्याचा निर्णय ५ वर्षे पुढे ढकलला तर व्यवसायातून पुढील ५ वर्षात कुठे पोहचू शकतो याचे त्याने ३-४ दिवसात पेपरवर नियोजन तर केलेच आणि त्याबरोबरच फॅमिलीला विचारात घेऊन घर बांधण्याचा निर्णय काही काळासाठी पुढे ढकलला आणि का आपण पुढे ढकलत आहोत त्याचे कारण आणि परिणाम ही समजून सांगितले. फॅमिलीने ही त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आणि या निर्णयात आम्ही सोबत आहोत याची अनुमती दिली. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर समाज तुमच्याबद्दल काय विचार करतो यापेक्षा तुमची फॅमिली तुमच्या वर विश्वास ठेवत असेल आणि त्यांना तुमच्या कष्टाचा अभिमान असेल तर ते ही तुमच्या सोबत असणारच. फक्त गरज आहे त्यांना उद्योगाचे योग्य आणि स्पष्ट चित्र दाखवण्याचे आणि खूपदा हेच दाखवले जात नाही.

समाजाचे मापदंड तोडून टाकले तर व्यवसायातील साखळ दंड कोणत्याच उद्योजकाला प्रगती करण्या पासून रोखू शकत नाहीत आणि हो हे तेव्हाच  
होऊ शकते जेव्हा वरील प्रमाणे फॅमिलीला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुमच्या आर्थिक परस्थितीची योग्य जाणीव त्यांना आहे.

धन्यवाद. 


---
महेश चव्हाण
संस्थापक - मराठी पैसा
संस्थापक - I4I Investment Services Pvt.Ltd.
+९१ - ९८२१८९९२११


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

आर्थिक साक्षरतेतून....उद्योग साक्षरता..!

Share This:

प्रतिक्रिया

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...