सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शेअर बाजार गुंतवणूक : एक बिजनेस पार्टनरशिप शेअर बाजार गुंतवणूक (ट्रेडिंग नाही) म्हणजे तुम्ही गुंतवणूक केलेल्या प्

30 Jul 2021 By श्री. महेश चव्हाण
3303 5 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

शेअर बाजार गुंतवणूक (ट्रेडिंग नाही) म्हणजे तुम्ही गुंतवणूक केलेल्या प्रमाणात तुम्ही त्या कंपनीचे पार्टनर असता. शेअर बाजार तुम्हाला संधी देते भारतातल्या अग्रगण्य कंपन्या मध्ये गुंतवणूक करून पार्टनर होण्याची. ज्या कंपन्याचे प्रॉडक्ट सर्विसेस आपण लहान पणापासून म्हणजे गेले १०-१५-२०-२५ वर्षे वापरतोय ज्यांच्या शिवाय आपले जगणे मुश्किल होऊ शकते अश्या कंपन्या चे पार्टनर आपण होऊ शकतो. जसे की...

  • कोलगेट
  • एशियन पेंट्स
  • फेविकॉल (पीडिलाईट)
  • मारुती सुझुकी
  • हिरो मोटोकॉर्प
  • हिंदुस्तान युनीलिव्हर
  • आय टी सी
  • ब्रिटनिया
  • गोदरेज
  • HDFC बँक
  • बजाज फायनान्स


वरील कंपन्या पैकी ७०% कंपन्याचे प्रॉडक्ट्स किंवा सर्विसेस आपण घेतल्या आहेत पण यांच्यात गुंतवणूक करण्याची कधी इच्छा झाली नाही किंवा शेअर्स घेऊन ५० - १०० रुपयांचा नफा पदरात पाडून आपण शेअर्स विकून टाकला असेल होना ?? त्या पैश्याचे काय केले आपण कोणत्या तरी दुसऱ्या शेअर्स मध्ये टाकले असतील किंवा त्या नफ्यातून स्वतः साठी एखादी वस्तू घेतली असेल पण आज तेच जर १-२ लाख  गुंतवणूक करून तसेच ठेवले असते तर आज १० वर्ष्यात त्याचे ५ पट - १० पट झाले असते. 

मागच्या आठवड्यात आलेल्या झोमॅटो शेअर्स ने ही हीच संधी दिली तुमच्या माझ्या सारख्या सामन्यांना पण होते काय आपण फक्त शेअर्सची किंमत पाहत राहतो आणि पुढील आयुष्यभर चालणारा व्यवसायाची पार्टनरशिप १०००० - २०००० नफा खिश्यात टाकून विकून टाकतो.

लक्षात घ्या १० वर्ष्यापूर्वी १०० - २०० करोड मध्ये सुरू झालेली झोमॅटो आज ६०००० करोड वर पोहचते. त्यात फूड डिलिव्हरी बिजनेस आताशी ७% भारतात पसरलेला आहे. अजून १० वर्ष्यात हा व्यवसाय किती मोठा होईल याचा जर अभ्यास केला आणि या व्यवसायात जर पार्टनरशिप केली तर आपण ही आपल्या हजारोचे लाख आणि लाखाचे करोड करू शकतो.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

Aishwarya satpute on 22 Sep 2022 , 9:59PM

khup chan

Vimal Somnath Gaikwad on 09 Oct 2021 , 9:05AM

खुपच छान मराठीत माहिती देतात. तुमच्या सर्वाचे आभार 🙏

more p. m on 05 Aug 2021 , 10:28PM

खूप छान आहे तुमची कल्पना

Umesh Mane on 04 Aug 2021 , 10:00AM

Investment in mutual funds

Manohar Satpute on 31 Jul 2021 , 4:36PM

तुमची संकल्पना खरच खुपच छान आहे. कारण मराठी माणुस शिक्षण साक्षर झाला, पण अजुन अर्थ साक्षर नाही झाला. तुमचे हे अँप नक्कीच मराठी माणसाला आर्थिकरित्या संपन्न करण्यासाठी मोलाची भुमिका बजावेल यात दुम्मत नक्कीच नाही. धन्यवाद 😊🙏🙏

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...