सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शेअर बाजारातून संपत्ती निर्माणात पुस्तकांचे महत्व आज खूप दिवसांनी काही पुस्तके समोर आली.... जी खरेदी केली तेव्हा त्यातली

11 Jan 2022 By श्री. महेश चव्हाण
2607 15 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

आज खूप दिवसांनी काही पुस्तके समोर आली.... जी खरेदी केली तेव्हा त्यातली ताकद कळाली न्हवती. पण आज १०-१५ वर्ष्यानंतर त्याचे महत्व पटते.

आज शेअर बाजारात एक गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करताना किंवा स्वतःची गुंतवणूक करताना, एखाद्या शेअर्स मध्ये किती वेळ गुंतवणूक करायची असा मोठा प्रश्न प्रत्येकाला असतो. एखादा चांगला शेअर्स २०० रुपयाला घेतला तर तो २२० गेला की सामान्य गुंतवणूकदार त्यात प्रॉफिट बुक करून नवीन शेअर्स शोधायला निघतो. पण त्यांना हे कळत नाही की हाच शेअर्स भविष्यात २२० चा ४०० होऊ शकतो. पण काय होते  कंपनी किती मोठी होईल याचा अंदाज नसल्याने किंवा ऐकीव माहिती वर गुंतवणूक केल्याने फक्त शेअर्स च्या किंमती वाढल्या की विकायचे इतकेच सामान्य गुंतवणूकदारांना माहीत असते पण जर तुम्ही शेअर बाजारात वॉरेन बफ्फेट सारखी संपत्ती निर्माण करायला आला आहात तर मार्गदर्शक पुस्तके खूप उपयोगी पडतात.

२००८ मध्ये शेअर बाजारात ब्रोकिंग च्या व्यवसाय सुरुवात केली आणि मंदी ने पुरेपूर घेरले या काळात कुठे चुकतंय हे जाणून घेण्यासाठी पुस्तके वाचायला सुरुवात केली. तेव्हा व्यवसायाचे स्वरूप खूप लहान असल्याने मार्केट बंद झाले की आपोआप पावले फोर्ट एरिया मध्ये वळायची. हुतात्मा चौक मध्ये जुनी पुस्तके चांगल्या किंमतीत मिळतात म्हणून न चुकता तिकडे फेरी मारायचो.

त्यावेळी Aaron Chaze या कॅनडा स्थित पोर्टफोलिओ मॅनेजर चे "INDIA : An Investors Guide to the Next Economic SuperPower" हे २००६ साली प्रकाशित झालेले पुस्तक २०० रुपये किंमतीला मिळाले. सगळे जग मंदी मध्ये असताना २००८ मध्ये इंडिया सुपर पॉवर हे शब्दच वाचाताना आनंद झाला. त्यात कॅनडा स्थित पोर्टफोलिओ मॅनेजर लिहितोय म्हणजे काहीतरी असेल या विचाराने हे पुस्तक घेतले.  या पुस्तकात काही महत्वाचे मुद्दे होते ते थोडक्यात सांगायचे झाले तर...

# भारत कसा जागतिक स्तरावर आपली छाप उठवू शकतो ?
# TCS-Infosys कंपन्या कश्या पद्धतीने Technology मध्ये मोठा रोल प्ले करू शकतात ? 
# भारत आणि चायना यामध्ये शाश्वत विकास कोण करू शकेल ?


त्यानंतर २०१४ मध्ये नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अश्या काही मोठया योजना राबवल्या गेल्या... २०१५ मध्ये "India Reloaded : Inside India's Resurgent Consumer Market" हे धीरज सिन्हा लिखित पुस्तक परत एकदा फक्त नाव आणि कव्हर पेज पाहून बेंगलोर एअरपोर्ट वर खरेदी केले. यातील थोडक्यात मुद्दे...

# भारतातील ग्राहक वर्ग आणि त्याच्या वाढलेल्या अपेक्षा ?
# टेलिकॉम क्षेत्रातील बदल Calling Vs Data ?
# मोबाईल चा वापर आणि ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी मोठयमोठय कंपनी ने बनवलेले स्ट्रेटजी ?
# FMCG क्षेत्रांत बेसिक पासून प्रीमियम प्रॉडक्ट्स ची वाढलेली गरज ? 


असे भन्नाट मुद्दे कव्हर केले होते.

आणि आता गेल्याच वर्षी २०२१ मध्ये परत एकदा कव्हर पेज पाहून खरेदी केलेले पुस्तक जे अजून अर्धे वाचायचे बाकी आहे ते म्हणजे ... "India 2030 : The Rise of A Rajasic Nation" या पुस्तकात ही नावाप्रमाणेच २०३० मध्ये भारत वेगवेगळ्या क्षेत्रात कसा असेल ?? काय काय पहायला मिळेल याबद्दल २० शोधनिबंध आहेत. यात ही भारतातल्या कंपन्या कुठे R&D करत आहेत ? कुठे पैसा लावत आहेत ? याबद्दल बारकाईने अभ्यास करून त्या त्या क्षेत्रातील अभ्यासक व्यक्तीनी लेख लिहले आहेत.

आज मागे वळून पाहिले कि पोर्टफोलिओ असलेले शेअर्स जसे की Bajaj Finance, Pidilite, Asian Paints, TVS Motors, Britannia, Page Industries आपण का खरेदी केले आणि आजपर्यंत का होल्ड करून आहोत याचे कुठेतरी धागे दोरे या २००६-२०१५-२०२१ मध्ये वाचलेल्या वेगवेगळ्या पुस्तकात सापडतात. कारण शेअर बाजारात ९०% गुंतवणूकदार हा पैसे कमवायला येतो तर १०% फक्त संपत्ती निर्माण करायला येतात. आणि संपत्ती निर्माण करायची असेल तर स्वतः चा अभ्यास लागतोच म्हणूनच जगातील श्रीमंत व्यक्ती आजही ६-८ तास वाचन करतो.

तुम्ही म्हणाल या वाचनामुळे काय होते ??? तर तुम्हाला ते क्षेत्र किती वाढू शकते याची व्याप्ती कळते. जसे की २०१२-१३ पासून आम्ही Page Industries कंपनी जीच्याकडे Jockey International या इनरवेअर बनवणाऱ्या ब्रँड ची मास्टर फ्रेंचांइजि यांच्याकडे होती यामध्ये आम्ही गुंतवणूक करत होतो. या कंपनी चा शेअर्स २०१२-१३ मध्ये ३००० च्या आसपास होता जो २०१५ साली २०१५ मध्ये ७-८००० पर्यन्त गेला. त्यावेळी ही आम्ही या कंपनी मध्ये गुंतवणूक करा म्हणून सांगत होतो. पण शेअर्स ची किंमत बघून गुंतवणूकदार नाक मुरडायचे. यात आम्हाला दिसत होते कंपनी ची ग्रोथ आणि भारतातील सतत वाढणारी लाइफस्टाइल. २०१५ च्या वार्षिक सर्वसाधारण रिपोर्ट्स मध्ये कंपनी ने उल्लेख केला आहे की अजूनही आम्ही फक्त १.५ करोड घरात पोहचलो आहे. भारताची लोकसंख्या १२० करोड पकडल्यास १०% लोक तरी सधन कुटुंबातील ब्रँडेड जॉकी इनेर वेअर कडे वळतील म्हणजेच कंपनी ला वाढीसाठी खूप सारा वाव आहे हे लक्षात आले.... वरील दोन्ही पुस्तकात वेगवेगळ्या क्षेत्रात किती वाढ होईल, कशी होईल, का होईल हे माहिती नुसार लिहिले होते.... त्यामुळेच आज Page Industries आज ४८००० ला एक शेअर्स झाला तरी अजून विकावासा वाटत नाही.

म्हणूनच शेअर बाजारात नव्याने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एकच सांगावेसे वाटते.... माहिती सगळीकडून घ्या पण संपत्ती निर्माण करायची असेल तर स्वतःचा अभ्यास लागतोच. तेव्हाच २०२२ मध्ये घेतलेले शेअर्स तुम्ही २०३०-२०४० पर्यन्त ठेवाल अगदी तसेच जसे तुमच्या आजोबांनी घेतलेली जमीन तुमच्या वडिलांनी राखून ठेवली म्हणून आज तुम्ही करोडपती आहात तसेच.

धन्यवाद
महेश चव्हाण
संस्थापक - मराठी पैसा
संस्थापक - I4I Investment Services Pvt.Ltd.
9821899211***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

sangita on 17 May 2024 , 9:08AM

sangita jadhav

Vinod Sarvade on 11 Jan 2024 , 11:09PM

khup chan

Santosh on 26 Mar 2023 , 12:27AM

छान माहिती दिली आहे

Harish k on 10 Dec 2022 , 7:59PM

एकदम बरोबर

Mahadev Patil on 25 Oct 2022 , 12:20PM

धन्यवाद सर....🙏🙏🙏

दत्तात्रय मोहन कदम on 12 Jul 2022 , 7:16AM

👍👍

मनोज गवई on 10 Jun 2022 , 5:19PM

खुपच, छान लेख आहे. वाचून अंतर मनातील चेतना जागृत झाली .मनापासून धन्यवाद

mithun on 12 Feb 2022 , 10:28PM

🙏 खुप छान सर

suraj on 09 Feb 2022 , 8:24PM

🙏

parikshit patil on 09 Feb 2022 , 8:16AM

खूप छान अगदी सोप्या सुटसुटीत भाषेत व्यवस्थित मुद्देशीर मांडणी करुन सांगताय आपण थोडक्यात, काय तर मी अगदी धन्य झालो शेअर मार्केट बद्दलची माहिती वाचून Thank you marathi paisa

Gaurav on 08 Feb 2022 , 5:53PM

👍

tukaram parab on 02 Feb 2022 , 3:24PM

nice information

अजित पाटील on 29 Jan 2022 , 7:17PM

तुम्ही खूप चांगले काम करता

amol mali on 13 Jan 2022 , 5:05PM

छान

SWAPNIL KHARAT on 11 Jan 2022 , 11:31AM

khup Sunder Lekh Sir

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...