सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तुमचा गुंतवणूक सल्लागार कोण??? बँकेतील अधिकारी कि कर्मचारी ??? आजकाल खूपवेळा बँकेत गेल्यावर आपल्याला बँकिंग कमी आणि

22 Nov 2019 By श्री. महेश चव्हाण
2099 7 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

आजकाल खूपवेळा बँकेत गेल्यावर आपल्याला बँकिंग कमी आणि इन्शुरन्स किंवा म्युचुअल फ़ंडच्या कार्यालयात आलोय का असे वाटते.
आपण कोणत्याही बँकेत जेव्हा आपल्याला विश्वास वाटतो तेव्हाच आपण तिथे अकाउंट काढतो आणि आपले बँकिंग व्यवहार त्याच्या माध्यमातून करत असतो. तुमचे हेच व्यवहार बँक ट्रॅक करत असते म्हणजे...
 
  • तुम्ही कमावता किती....
  • तुमची लाइफस्टाइल काय आहे....
  • तुमचा एव्हरेज बॅलन्स किती आहे...

हे ही वेळोवेळी बँक पाहत असते. यातूनच तुम्हाला 
 
  • ही FD करा....
  • ही पॉलिसी घ्या....
  • आमच्या बँकेचा हा म्युचुअल फंड चांगला आहे....
  • किंवा आमचा यांच्या सोबत tieup आहे...

म्हणजे काय आपल्या ग्राहकांना वेगवेगळे प्रॉडक्ट विकणे आणि कमिशन कमविणे... तसेच खूपवेळा आपण 
 
  • कार लोन...
  • होम लोन... 
  • बिजनेस लोन...

करायला बँकेत जातो आपली सर्व माहिती घेतल्यावर मी तुम्हाला सर्व करून देतो पण तुम्हाला वार्षिक १००००० रुपयांची ही पॉलिसी करावी लागेल. आपण हसत हसत लोन होतंय या आनंदात सह्या करतो पण नंतर लक्षात येते ती पॉलिसी तुमच्या काहीच गरजेची न्हवती. आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा बँकेतील तो कर्मचारी दुसऱ्या ब्रांच मध्ये बदली झालेला असतो किंवा त्याने बँक बदलली असते.

तुमच्या कष्टाचा पैसा जोपर्यंत तुम्हाला स्वतःला पटत नाही तोपर्यंत गुंतवू नका हा नियम लक्षात ठेवा.

हॉटेल मध्ये जेवल्यावर पान खाण्यासाठी आपण पानवाल्या कडे जातो पण हॉटेल च्या गल्ल्यावर ठेवलेलं 2 दिवसांपूर्वी बनवलेले पान खात नाही तसेच आपल्या गुंतवणूक बँकेने ठरवलेल्या पॉलिसी किंवा फ़ंडात करून डोक्यावर हात मारून घेऊ नका आजची गुंतवणूक उद्याचे आपले आर्थिक जीवन ठरवते यासाठी जसे आपल्या फॅमिली चा फॅमिली डॉक्टर असतो तसा प्रत्येक फॅमिली चा गुंतवणूक सल्लागार असणे ही काळाची गरज आहे.

***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

Sachin Mahadev Jathar on 20 Jun 2022 , 10:11AM

आपल्या फॅमिली चा फॅमिली डॉक्टर असतो तसा प्रत्येक फॅमिली चा गुंतवणूक सल्लागार असणे ही काळाची गरज आहे. खरंच काळाची गरज आहे. लेख दर्जा 👌

Ramdas on 17 Jun 2021 , 2:42PM

right sir

Deepak on 17 Sep 2020 , 8:15PM

mast

Tushar on 24 Jul 2020 , 12:58PM

sir arthik niyojana kase karave ya vishaya var var Kahi sanga

a on 26 Jan 2020 , 7:58PM

right sir

रणजित नाटेकर on 24 Nov 2019 , 8:15PM

बरोबर !!!👍

Ravikumar Vedpal Chopra on 23 Nov 2019 , 7:34PM

good

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...