सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड म्हणजे काय?

14 Nov 2018 By श्री. महेश चव्हाण
1851 23 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असणारे बहुतेक जण "सर मी डिमॅट अकाउंट ओपन करून शेअर्समध्ये डायरेक्ट गुंतवणूक करू" कि "म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करू?" असे प्रश्न विचारत असतात. या दोन्ही गुंतवणुकीचा उद्देश हा भविष्यातील गरजांसाठी लागणारी रक्कम उभी करणे किंवा आपल्या सध्याच्या मिळकतीचे रूपांतर मोठया संपत्तीत करणे हाच आहे परंतु दोन्ही मध्ये जोखीम वेगेवेगळ्या प्रकारची आहे.

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

समजा मला मुबंई ते पुणे प्रवास करायचा आहे तर माझ्याकडे कोणते मुख्य पर्याय असतील ?

• बस किंवा ट्रेन म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा 
• स्वतःची कार 


या दोन पर्यायापैकी कोणता पर्याय निवडावा हा माझा प्रश्न आहे तर आपण दोन्ही बाजू बघू या.

आता पहा माझ्याकडे स्वतःची कार आहे, मी स्वतः व्यवस्थित चालवू शकतो आणि या प्रवासातील सर्व धोके, सर्व करावे लागणारे खर्च हे मला माहित आहेत आणि मला अनुभवही आहे, तर स्वतःची कार घेऊन जाणे हा पर्याय आहे पण जर समजा मला कार ड्राईव्ह करत जाणे, इतर गोष्टीची जोखीम अंगावर घेणे, कोणता मार्ग निवडू यात पडायचे नसेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट हा माझ्यासाठी बेस्ट पर्याय असेल. हे दोन पर्याय म्हणजे शेअर्समध्ये सरळ गुंतवणूक किंवा म्युच्युअल फंड मार्फत गुंतवणूक आता तुम्हाला ठरवायचे आहे तुम्हाला काय योग्य वाटते.

"म्युच्युअल फंड" हे असे गुंतवणुकीचे साधन ते खास अशा गुंतवणूकदारांसाठी बनविले आहे. 

• ज्यांना गुंतवणुकीचे ज्ञान नाही. 
• ज्यांना वेळ नाही आणि 
• ज्यांना शेअर बाजारातील चढ-उतारापासून दूर राहायचे आहे.


या नवीन किंवा अज्ञान गुंतवणूकदाराला शेअर बाजारात गुंतवणुकीची संधी मिळावी म्हणून म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत असतात. नावाप्रमाणेच म्युच्युअल म्हणजे एकत्र आणि फंड म्हणजे पैसा. अशा प्रकारे लोकांचा पैसा एकत्र करून तो अभ्यासपूर्वकरित्या शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजेच म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जमा होणारा सर्व फंड योग्य अभ्यासपूर्वक गुंतवणूक करण्यासाठी Fund Manager असतात.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीबद्दल अजून जाणून घेऊया.

1. शेअर्सचे जसे भाव असतात तसे म्युच्युअल फंडची NAV असते. (नेट अॅसेट व्हॅल्यू )

2. म्युच्युअल फंड तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीकडून किंवा डिमॅट अकाउंटलाही खरेदी करू शकता 

3. म्युच्युअल फंड मध्ये दरमहा कमीत कमी ५०० रुपयापासून आणि एक रक्कमी ५००० अशी गुंतवणूक करू शकतो.
 
4. म्युच्युअल फंडची NAV दिवसाला बदलत असते. 

5. नवीन म्युच्युअल फंड मधील पैसा ३ वर्षासाठी कुलूप बंद म्हणजेच लॉक-इन पिरियडमध्ये असतो. 

6. शेअर्समधील गुंतवणुकीप्रमाणे म्युच्युअल फंड मध्येही डिविडेंड मिळतो. 

7. सरळ शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंडमध्ये जोखीम कमी असते. 

8. नवीन गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

सुधीर महाजन on 29 Jun 2023 , 11:11AM

बेस्ट ॲप

pravin Dattatray jagtap on 02 Oct 2022 , 1:13PM

खूपच छान माहिती दिलीत सर त्याबद्दल मनापासून धन्यवाद

ashok kshirsagar on 09 Jun 2022 , 2:19PM

ok

Ankush Harikisanji Patil on 31 Dec 2021 , 11:05PM

खूप छान माहिती दिली आहे

priyanka bhosale on 31 Dec 2021 , 4:38PM

छान

अविनाश निंबाळकर on 27 Aug 2021 , 4:05PM

सहज सोप्या शब्दात MF समजवले आहे 👍🏻

Sandip Tukaram Auti on 11 Jun 2021 , 9:48PM

Very Informative

???????? ???? on 25 Jun 2020 , 10:17AM

धन्यवाद उपयुक्त माहिती

योगेश प्रभाकर on 27 Apr 2020 , 5:24PM

😅😅 खूपच सुंदर माहिती दिली आहे....

aniket on 23 Apr 2020 , 2:26PM

sir a.r.n code kase kadve?

Suhas on 28 Mar 2020 , 12:01AM

कमी शब्दात जास्त माहिती

aniket on 12 Mar 2020 , 3:32PM

mutual fund chi agency kashi kadu.tyasathi kay karave laagel?

Ganesh Jedhe on 14 Feb 2020 , 12:17PM

मला गुंतवणुक करायची आहे मार्गदर्शन करा

aniket c dalvi on 09 Feb 2020 , 8:08PM

mala sangaa.mutual fund chi agecy kashi ghyavi?

aniket on 04 Oct 2019 , 5:29PM

very good blog

Yogesh Bamnote on 03 Mar 2019 , 1:54PM

khup chan sir

Deep on 27 Jan 2019 , 3:53PM

nice

rajaram on 14 Jan 2019 , 4:44PM

khup chan mahiti

Sachin ghatage on 12 Jan 2019 , 7:56PM

Good

BALIRAM JADHAV on 30 Dec 2018 , 3:05AM

very nice sir.. thank you

Mahesh Chavan on 18 Dec 2018 , 11:49PM

अनंत सर पुस्तक आहे "स्मार्ट गुंतवणूकदार" 8080501177 यावर संपर्क करा

Anant Arvind Watpade on 07 Dec 2018 , 2:58PM

पुस्तक आहे ka

श्यामकांत निम्बादास खैरनार on 05 Dec 2018 , 10:09PM

सविस्तर असावे

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...