संकल्पना
मराठी पैसा....ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा
गेल्या १०-१५ वर्ष्यात भारताने जी आर्थिक प्रगती केली त्यामुळे जगाच्या अर्थकारणात भारताला वगळून चालणार तर नाहीच पण जगभर व्यवसाय करणाऱ्या कंपन्या नी आपली पुढील बाजारपेठ म्हणून भारतात आपले उद्योगचा विस्तार करायला सुरुवात ही केली.गेल्या काही वर्ष्यात सर्वात मोठा बदल आपल्या मानसिकतेत झाला आहे. पैश्याची बचत करण्याची मानसिकता कमी होऊन आता खर्च करण्याची मानसिकता तयार होत आहे.
जगप्रसिद्ध गुंतवणूक दार आणि “रिच डॅड पूर डॅड” पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार “आर्थिक जीवन आता सोपे राहिले नाही आपल्याला आता जास्तीत जास्त स्मार्ट होण्याची गरज आहे” आपल्या जीवनात शिक्षणाच्या तीन पायऱ्या असतात.
पहिली पायरी : शालेय शिक्षण
दुसरी पायरी : महाविद्यालयीन शिक्षण
तिसरी पायरी : आर्थिक शिक्षण
जगभरात आज पहिल्या आणि दुसऱ्या पायरी चे शिक्षण देणाऱ्या लाखो शाळा महाविद्यालये आहेत पण आर्थिक शिक्षण देणाऱ्या शाळा उपलब्ध नाहीत. आपण वयाच्या २४-२५ पासून पैसा कमवायला लागतो तिथून वयाच्या ६० पर्यंत आपण पैसा कमवायला पळत असतो पण तोच कमावलेला पैसा…..
- हाताळायचा कसा ?
- बचत कसा करायचा?
- गुंतवायचा कसा ?
- पैशाला कामाला कसे लावायचे?
हा विचार सामान्य व्यक्ती कधीच करत नाही. आज आपल्या कमाई मधून काही उत्पन्न भविष्यातील गरजासाठी योग्य गुंतवणूक करावी असे आपल्याला वाटत नाही त्यामुळे ६० नंतर ही काम करण्याची वेळ ५०% लोकांना येते. म्हणूनच वेळ आली आहे अर्थ साक्षर होण्याची….
आज आर्थिक साक्षरतेत काम करणारे खूप जण आहेत पण कुठेतरी याचे मोठे व्यासपीठ उभा रहावे आणि घराघरात आर्थिक साक्षरता पोहचविण्यासाठी “मराठी पैसा….ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा” या उपक्रमाची कल्पना डोक्यात आली. गुंतवणुक क्षेत्रातील मान्यवरांचे लिखाण एकाच व्यासपिठावर महाराष्ट्रातील सर्व जनतेला उपलब्ध व्हावे या कल्पनेतून मराठी पैसा या संकल्पनेचा उगम झाला. संपूर्ण महाराष्ट्र जर अर्थ साक्षर करायचा असेल तर यासाठी कोणी एका दुकट्याने हे कार्य पार पाडता येणार नाही हे लक्षात आले.
वाचाल तर वाचाल हे १००% खरे असले तरी आजच्या माहितीच्या युगात “आपण नक्की काय वाचणार ?” हे खूप महत्त्वाचे ठरते…..व्हाट्स अँप फेसबुक च्या माध्यमातून माहितीचा पूर आलेला आहे. त्यामध्ये मराठी पैसा….निवडक आणि माहितीपूर्ण लेख जे तुमच्या आर्थिक जीवनाला एक नवी दिशा होतील……यातील लेखक तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतील. मराठी पैसा च्या माध्यमातून….
- आर्थिक नियोजन
- गुंतवणूक नियोजन
- विमा नियोजन
- मालमत्ता व्यवस्थापन
- शेअर बाजार गुंतवणूक आणि
- ट्रेडिंग
- म्युच्यअल फंड
- कर्जे
- पुस्तक परिचय
- गुंतवणूक गुरू
- पैश्याचे व्यवस्थापन
या विषयावर महाराष्ट्रातील आर्थिक क्षेत्रातील अनुभवी लेखक मार्गदर्शन करणार आहेत.जगातील सर्वश्रेष्ठ राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र आणि शास्त्र याचा योग्य वापर करुन वेळोवेळी परकीय आक्रमणांना जेरीस आणले. तसेच आज आपण आर्थिक शास्त्र जर आपण योग्यरितीने आत्मसात केले तर भविष्यातील महाराष्ट्र आर्थिक रित्या समृद्ध असेल यात काहीच शंका नाही.
धन्यवाद!
महेश चव्हाण आणि
टीम मराठी पैसा.
www.marathipaisa.com