सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दीर्घ कालीन गुंतवणूक करताना... वर्ष्याला २५० दिवस शेअर बाजार चालू असतो म्हणजे २५०० दिवस होतात १० वर्ष

23 Dec 2021 By श्री. महेश चव्हाण
2792 2 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

वर्ष्याला २५० दिवस शेअर बाजार चालू असतो म्हणजे २५०० दिवस होतात १० वर्ष्यात. यापैकी ५०-६० दिवसात मोठे रिटर्न्स मिळतात. म्हणजेच फक्त २% कालावधी मध्ये मोठा रिटर्न्स मिळतो. पण गंमत अशी आहे हे ५०-६० दिवस कधी येतील माहीत कुणालाच माहीत नसते. आणि हे दिवस जर हातातुन निसटले तर मिळणारे रिटर्न्स मध्ये खूप मोठी तफावत पाहायला मिळते ती खालीलप्रमाणे.

१ जानेवारी१९८० मध्ये गुंतवणूक केलेल्या १०००० चे मूल्य पाहूया... (२१ ऑक्टोबर २०२१ पर्यन्त) :

सर्व दिवस गुंतवणूक आहे तशी ठेवल्यास : ५०.१८ लाख

५ दिवस हातातून निसटल्यास : ४१.१४ लाख (९ लाखाचे नुकसान)

१० दिवस हातातून निसटल्यास : ३५.१७ लाख (१५ लाखाचे नुकसान)

३० दिवस हातातून निसटल्यास: १८.४६ लाख ( ३१ लाखाचे नुकसान)

५० दिवस हातातून निसटल्यास : ५.४४ लाख ( ४४ लाखाचे नुकसान)

लक्षात घ्या जगातील श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफ्फेट सर ही एक खंत व्यक्त करतात मार्केट कधी पडेल कधी वाढेल याचा निष्कर्ष करण्यात मी माझ्या आयुष्याची ४-५ वर्षे घालवली.... तुम्ही १०००० गुंतवा पण ते दीर्घ काळासाठी असावेत मार्केट वर खाली होतच रहाणार पण जितके तुम्ही जास्त संयम दाखवाल तितके चक्रवाढ व्याज तुमच्यासाठी जास्त कार्य करेल.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

Schin kulkarni on 06 Feb 2022 , 8:03PM

काय करायचे ते नाही सांगितले

Prathmesh on 28 Dec 2021 , 8:37PM

thanks

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...