आर्थिक नियोजन

श्री. महेश चव्हाण

खूपवेळा आर्थिक नियोजन करण्यासाठी पती पत्नी आमच्याकडे येतात, नेहमीच्या आर्थिक अडचणींना सामोरे जाताना दोघा मधील संवाद संपलेला असतो. सहकार्याची भाषा जाऊन भेटेल तिथे एकमेकांच्या चुका काढण्याची भाषा चालू झालेली असते.

या आर्थिक अडचणीत अडकलेल्या परिवाराला आमचे एकच सांगणे असते… तुम्ही आधी तुमच्या आर्थिक परिस्थितीचा स्विकार करा.

ज्याप्रमाणे रस्त्यावर एखादा अपघात झाला तर…

आपण कुणाला इजा झाली का ? 
गाडीचे काही नुकसान झाले का ?
कुणाला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे ?

वरीलप्रमाणे आपण निर्णय घेतो…

तिथे आपण भांडत बसतो का तर नाही कारण तिथे भांडत बसल्यावर अधिक हानी होण्याची शक्यता असते. 

तसेच जर आर्थिक जीवनात एखादी घटना घडली तर पती-पत्नी ने एकमेकांना संपूर्ण पारदर्शकता ठेऊन जर नव्याने सुरुवात केली तर जगातील कोणतीच ताकद त्यांना रोखु शकत नाही.

***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे “मराठी पैसा – ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा” हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

शेअर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुमच्यासाठी सुचवलेले