सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

एंजल इन्हेस्टर्स नवीन व्यवसायात गुंतवणूक करताना काय पाहतात? उद्योग निर्मितीसाठी नुसत्या संकल्पना असून चालत नाही, भांडवल आवश्यक असत

02 Mar 2019 By
303 1 Comments
post-1

उद्योग निर्मितीसाठी नुसत्या संकल्पना असून चालत नाही, भांडवल आवश्यक असते, तॆ बँका, फायनान्स, कॅपिटल व्हेंचर फंडिंग, एंजल इन्हेस्टर्स यामार्फत मिळवता येते. सध्या नवोद्योजकांना वित्त पुरवठा करण्यासाठी अनेक एंजल इन्हेस्टर्स पुढे येत आहेत. एंजल इन्हेस्टर्स हे श्रीमंत व्यक्ती असतात. जे नवोद्योजकांच्या व्यवसायात पैसा व वेळ गुंतवतात. भांडवल उभारणी करण्यासाठी हा एक सोपा व सुलभ मार्ग असतो.  एंजल इन्हेस्टर्स कोणत्याही नवीन व्यवसायात पैसा गुंतवण्यापूर्वी काही गोष्टी पडताळून पाहतात.
 
1) व्यवसायिक व त्याची मॅनेजमेंट टीम : एंजल गुंतवणूकदार हे तुमच्या व्यवसायापेक्षा नवउद्योजक व त्याच्या कल्पकतेला  महत्व देतात. त्याची मॅनेजमेंट टीम परिपूर्ण व सहयोगपूर्ण आहे का? एंजल गुंतवणूकदार पैसे उद्योगात नाही तर या उद्योगाशी संबंधित लोकांमध्ये गुंतवतात. त्यांना हे पहायचे असते की, आपण गुंतवणूक करत असलेला व्यवसाय योग्य व कुशल लोकांच्या हातात आहे. एका परिपूर्ण मॅनेजमेंट टीममध्ये मार्केटींग, सेल्स, मॅन्युफॅक्चरींग, कर्मचारी व्यवस्थापन व अकाऊटिंग या घटकांचे कौशल्य असावे.
 
2) प्रभावी बिझनेस प्लॅन : एंजल गुंतवणूकदारांना एक विश्वासार्ह व परिपूर्ण बिझनेस प्लॅन अपेक्षित असतो. तुमच्या व्यवसायाची उद्दिष्टे व त्यासंबंधी तुम्ही विकसित केलेला दृष्टीकोन याची व्यवहार्यता पाहिली जाते. तसेच एंजल गुंतवणूकदार तुमची आर्थिक ध्येये तपशीलवार मार्केटींग योजना व तुमच्या लक्षित मार्केट जाणून घेतात.
 
3) सक्षम परताव्याची संभावना : एंजल इन्हेस्टींग ही एक जोखीम युक्त बाब असते. त्यामुळे एखाद्या व्यवसायात पैसे गुंतवण्याआधी तेवढे पैसे किंवा त्याहून अधिक परतावा मिळावा ही त्यांची अपेक्षा असते. ते जास्त उत्पन्न क्षमतेच्या व्यवसायात पैसे गुंतवण्यास नेहमीच उत्सुक असतात.
 
4) गुंतवणूक करण्याजोगा व्यवसाय : एक लक्षात ठेवा एक चांगला एंजल गुंतवणूकदार स्वत: यशस्वी उद्योजक असतो. त्यामुळे ते एखादा यशस्वी उद्योग घडवण्यास व विकसित करण्यास नेहमी उत्सुक असतात. त्यामुळे नवोद्योजकांनी आपला बिझनेस प्लॅन तज्ञाच्या सल्ल्यानुसार त्यांच्याकडे सादर करावा.
 
5) गुंतवणुकीतही बिझनेस : काही एंजल गुंतवणूकदार कर्ज रूपाने वित्तपुरवठा करतात. तर काही गुंतवणूकदार भागीदार म्हणून पैसे गुंतवतात. तुमच्या बिझनेस सरंचीत असावा. बरेच गुंतवणूकदार गुंतवणूकींची परतफेड म्हणून तुमच्या कंपनीचे शेअर व्होल्डर बनवण्यासही उत्सुक असतात. त्यामुळे त्यांच्या कडून मदत मागण्याआधी या गोष्टींचा विचार करावा.
 
6) प्रत्यक्ष सहभाग : एंजल गुंतवणूकदार नवीन व्यवसायात फक्त पैसे गुंतवत नसतात, त्यांना परतफेड म्हणून पैसे अपेक्षित नसतात. ते तुमचा व्यवसाय विकसित करताना स्वत: सहभागी होतात. त्यांना नवउद्योजकांसाटी एक मार्गदर्शक व कधी कधी कंपनीच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभागी बनायचे असते. काही वेळा ते तुमच्या कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी होण्यासाठी इच्छा व्यक्त करतात. एंजल इन्हेस्टर्स मिळवण्यासाठी तुमच्याकडे एक सक्षम बिझनेस प्लॅन, त्याची विस्तृत व तपशीलवार संरचना व एक परिपूर्ण मॅनेजमेंट टीम असणे आवश्यक आहे.
 
महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी मी काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र परिचितांना पाठवा, पूर्वी प्रसिध्द झालेले लेख हवे असल्यास आम्हास कळवा, मला pro2bhosale@gmail.com वर मेल करा किंवा ९८६७८०६३९९ व्हॉटसअप करा.

Share This:
Tags :

प्रतिक्रिया

UTTAM KENJALE on 02 Mar 2019 , 9:25AM

good

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...