सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पैश्याचा हव्यास : सदा असंतुष्ट रजत गुप्ता जन्म : कलकत्ता लहानपणीच अनाथ झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थित

24 Sep 2021 By श्री. महेश चव्हाण
3338 4 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

रजत गुप्ता. जन्म - कलकत्ता

लहानपणीच अनाथ झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून मिळालेल्या आजूबाजूच्या मित्र परिवाराच्या जोरावर आणि स्वतःच्या मेहनतीवर वयाच्या ४० व्या वर्षी तो मॅककिन्सचा CEO झाला. ही कंपनी २००७ मध्ये जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित सल्लागार कंपनी होती.

हळूहळू तो अतिश्रीमंत लोकांचा मित्र बनला, बिल गेट्स च्या सामाजिक कार्यात तो भाग घेऊ लागला. या काळातच त्याच्याकडे राक्षसी संपत्ती निर्माण झाली ती इतकी होती की २००८ ला फक्त त्यावर व्याज पकडले तर तासाला त्याच्या अकाउंट मध्ये 600 डॉलर सहज मिळतील इतके.

उरलेल्या आयुष्यात त्याने काही नाही केले तरी चालले असते पण त्याला अमेरिकेतील टॉप १०० अतिश्रीमंतांच्या यादीत जायचे होते यासाठी त्याने मग शॉर्टकट चा मार्ग निकडला शेअर बाजारातील Insider ट्रेडिंग चा... म्हणजे शेअर बाजारातील काही खाजगी माहितीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करायचा.

यात तो फसला गेला आणि आता या आर्थिक गुन्ह्यात सगळी संपत्ती गमावून बसला त्याच बरोबर समाजातील प्रतिष्ठा धुळीस मिळवून शेकडो करोड रुपये कमाऊन सुद्धा अति हव्यासापायी शुन्य नाही तर संपूर्ण आयुष्य देशोधडीला लावून बसला.

रजत गुप्ता सारखे अति हव्यास करणारे सगळीकडे दिसतात. ५-१०% महिन्याला मिळवण्यासाठी १००% देशोधडीला लावणारे आणि ५-१०% महिन्याला देणारे हे ही याच कॅटेगरी मध्ये. हळूहळू हा खेळ इतका मोठा होतो की देणारा आणि घेणारा यांना कुठे थांबायचे कळत नाही. कारण १० लाखाला महिन्याला मिळणारा १ लाखाचा झरा कुणाला थांबवायाचा नसतो आणि १०% देणाऱ्याला लोकांना पैसे वाटायला नवीन १००% हवे असतात.

योजना संपली कि तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय नसतो... काही तर मी कसा नफ्यात बाहेर पडलो याच्या रंजक कहाण्या आयुष्य भर सांगत फिरणार आहेत (खरे लॉस मध्ये असले तरिही)

संदर्भ : पैश्याचे मानसशास्त्र
लेखक : मॉर्गन होउजेल



***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

mahesh Kamble on 17 Oct 2021 , 6:04AM

right sir

Ravindra shelke on 25 Sep 2021 , 11:46AM

बरोबर सर अती केल तर माती होणारच

Sonali kamble on 24 Sep 2021 , 12:31PM

ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायला गेले की असेच होणार. वरील लेखातील व्यतीला रोज एक सोन्य च अंड मिळत होत पण याला हाव लागली 100 अंडी मिळवायची आणि म्हणून कोंबडीचं नष्ट केली. म्हणून गरजे ईतक मिळवाव आणि समाधानात सुख मानाव.

SWAPNIL KHARAT on 24 Sep 2021 , 12:00PM

Agadi Khar ahe Sir. Ati Havyas Nasava

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...