श्री. महेश चव्हाण
तरुण वयात जास्तीत बचत आणि गुंतवणुकीकडे कल असायला हवा पण सध्या तरुण पिढी कर्जाच्या विळख्यात जास्तीत जास्त गुरफटत आहे….
सुरुवात होते बजाज फायनान्स वर मोबाईल घेण्यापासुन…
मग बाईक साठी कर्जे…
मग कार साठी कर्जे…
मग घरासाठी कर्जे…
हळूहळू हा पाश कसा आवळत जातो हे कळत नाही… आणि मग जेव्हा कधी ३५-४० ला स्वतःचा व्यवसाय किंवा मनाप्रमाणे आयुष्य जगवेसे वाटते ते जगता येत नाही कारण EMI शी केलेली दोस्ती आता सहजासहजी तोडता येत नाही.
तरुण वयात म्हणजे २५ ते ३५ मध्ये जितकी गुंतवणूक करता येते तितकी ३५-५० मध्ये करता येत नाही. ५०शी नंतर तर आता रिटायरमेंट घेण्याकडे कल वाढलेला आहे. बहुतेक जण हे स्वप्न पाळून असतात पण खऱ्या आयुष्यात त्यांच्याकडे कोणताही प्लॅन नसतो…. म्हणजेच काय तर ते फक्त स्वप्न असते आणि स्वप्न किती खरी होतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.
आपल्या स्वप्नांना ध्येया मध्ये रूपांतर करायचे असेल तर त्यासाठी योग्य नियोजन आणि ध्येय गाठण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. तरुणपणात मिळणारे लाखो रुपयांचे पॅकेज जर योग्य रित्या नियोजन केले तर महेंद्र सिंग धोनी सारखी स्वतः रिटायरमेंट घेता येते.
म्हणूनच म्हणावेसे वाटते…
SIP शी दोस्ती : स्वातंत्र्य
EMI शी दोस्ती : गुलामी
आर्थिक नियोजन , रिटायरमेंट, गुंतवणूक नियोजन या प्रत्येक परिवाराच्या गरजा आहेत त्याबद्दल योग्य माहिती घेऊन आपल्या परिवाराचे आर्थिक नियोजन करून घ्या.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे “मराठी पैसा – ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा” हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa