आम्ही २००५-६ साली कॉलेज करत करत दिशा कॉमर्स क्लास मध्ये जॉब करत होतो…. वरलीतील आमच्या मित्र परिवाराकडून माहिती मिळाल्यानंतर सिग्मा ऑटोलिंक प्रायव्हेट लिमिटेड या मुंबईतील कंपनी मध्ये गुंतवणूक केली होती. ही कंपनी गुंतवणूकदारांकडून १ लाख रुपये घेत असे आणि महिन्याला ७% म्हणजे ७००० रुपये परतावा देत असे. तेव्हा आजच्या सारखे आर्थिकदृष्ट्या साक्षर न्हवतो…. महिन्याला ५००० पगार होतो….. म्हणून आम्ही ४ मित्रांनी मिळून २५००० काढून १ लाख गुंतवणूक केली होती….. ६ महिने पैसे मिळाले नंतर चेक बाऊन्स व्हायला लागेल… तेव्हा मी रहायला वरळी मध्ये होतो तर कंपनी चे ऑफिस ठाण्यात… हा प्रवास दीड तासाचा…. त्यात जॉब त्यामुळे १-२ महिने आम्ही फॉलोअप घेतला नंतर विषय सोडून दिला…. पण ज्यांचे मोठे पैसे अडकले होते त्यांनी तगादा चालू ठेवला…. कंपनीच्या मालकावर आणि फॅमिली वर केसेस झाल्या…. मग महाशय पुढे आले पण एक चांगली आयडिया घेऊन….. त्याबद्दल…
● कंपनीच्या महाशय नी मुंबईमधील मोठा हॉल बुक केला आणी तिथे गुंतवणूकदारांना बोलावले… सर्व प्लॅनिंग करून..
● मी आधी खूप गरीब होतो म्हणून मला लहानपणापासून श्रीमंत व्हावेसे वाटायचे.
● म्हणून मी खूप अभ्यास केला शिकलो मग अनुभव घेऊन ही कंपनी चालू केली
● गरीब लोकांना श्रीमंत करणे हेच माझे मिशन होते
● आतापर्यंत मी हजारो लोकांना श्रीमंत केले जे सायकल घेऊ शकत न्हवते ते आज कार मधून फिरत आहेत (त्यातले काहीं जणांना स्टेज वर बोलवले… आल्या आल्या त्यांनी त्याच्या पाया पडून आपले जीवन कसे बदलले ते सांगितले)
● हे करताना मला श्रीमंत आणि सरकार कडून टॅक्स चोरीचा माझ्यावर आरोप करून मला अडकवण्यात आले.
● आता माझे सर्व बँक अकाउंट सीझ केले आहे त्यामुळे मी पैसे देऊ शकत नाही पण मी अजून हरलो नाही.
● कारण मला तुमचा सपोर्ट आहे आपल्यातील काही लोकांनी माझ्यावर केस टाकल्या आहेत त्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही.
● तर आज मी जाहीर करतो कि माझी सिग्मा ऑटोलिंक कंपनी पुढील ३ महिन्यात शेअर बाजारात लिस्ट करणार आहे ज्यांचे जितके पैसे अडकले आहेत त्यांनी ३ महिने थांबल्यास त्यांना माझ्या कंपनी चे शेअर्स दिले जातील त्याची किंम नक्कीच ५-१० पट होईल.
● तर ज्यांना माझ्यावर केस टाकायची आहे त्यांनी वर स्टेज वर या आणि जे माझ्या सोबत आहेत त्यांनी माझ्यासोबत आहेत याचा फॉर्म भरून द्या.
● पुढील ३ महिन्यात आपण शेअर बाजारात शेअर्स लिस्ट करू तेव्हा आपण तिकडेच भेटू हे आश्वासन दिले.
● त्याच्या विरुद्ध आवाज उठवणारे ही खुश झाले आणि ३ महिन्यांनंतर चांगला परतावा भेटणार म्हणून घरी गेले त्यात आम्ही ही होतो.
आता पुढे काय घडले तर….
आजतागायत ते ३ महिने कधी आले नाहीत आणि या कंपनीचा मालक ८०० करोड रुपयांची फसवणूक करून २००६ पासून गायब आहे.
सांगायचे हेच आहे कि, जिथे वेळ मागितला आश्वासन दिले जाते तिथे भ्रमनिरास होणारच आहे आणि समोरचा योग्य प्लॅनिंग करून निघून जाणार आहे.
कंपनीचे नाव गुगल ला टाका सर्व फसवणुकी बद्दल माहिती येतीलच.
तात्पर्य : आकर्षक गुंतवणूक योजनांच्या जाळ्यात अडकू नका आणि अडकलात तर योग्य कारवाई करण्यात ढिलाई करू नका.