नोकरी मध्ये रस राहिलेला नाही किंवा त्यातून आपल्या परिवारासाठी आर्थिक गरजा आपण भागवू शकत नाही म्हणून आता आपले बहुतेक मराठी बांधव उद्योगात येत आहे त्यांच्यासाठी महत्वाचे…..
उद्योग सुरू करताना त्यासाठी लागणारी सेट अप कॉस्ट आणि तिथून पुढे ३ वर्षांच्या महिन्याचा खर्चचा ताळेबंद आखा.
उद्योगासाठी पैसा उभारताना ३ वर्षेचा ताळेबंद डोक्यात ठेवा….खूप जण झटपट व्यवसायात उतरण्याची घाई करतात आणि मग सेट अप टाकल्यावर महिन्याच्या खर्च जसे कि….
🏭 दुकानाचे भाडे
👷🏻 स्टाफ चा पगार
🥡 धंद्यातील माल
⛽ इलेक्ट्रिक बिल
असे मासिक खर्च हाताळताना बेजार होऊन जातात…. यासाठीच तुम्ही किती जरी चांगले प्रॉडक्ट्स किंवा सेवा देत असाल पण जर तुमच्याकडे पैश्याचे व्यवस्थापन नसेल तर तुमचा व्यवसाय पहिल्या १-२ वर्ष्यात बंद पडेल…. हो हे मी नाही सांगत आहे तर जगभरातील ७०-८०% व्यवसाय पैश्याचे व्यवस्थापन नीट नसल्याने पहिल्या एका वर्षात बंद पडतात.
जास्तीत जास्त मध्यमवर्गीय मराठी परिवाराने व्यवसायात यावे पण तो उभा करताना भावनिक न होता ३ वर्ष्याचे नियोजन करून उतरावे…. तसेच आपल्या परिवाराच्या म्हणजे घरखर्च, मुलांचे शिक्षण याची ही तरतूद करून योग्य नियोजन करून उतरलेले कधीही योग्यच. कारण व्यवसाय हा पैश्यावर चालतो भावनेवर नाही…. व्यवसाय चालू करण्यास थोडा विलंब लागला तरी चालेल पण घाई करून चक्रव्यूहात अडकू नका.