पैश्याचा हव्यास : सदा असंतुष्ट

रजत गुप्ता. जन्म – कलकत्ता

लहानपणीच अनाथ झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून मिळालेल्या आजूबाजूच्या मित्र परिवाराच्या जोरावर आणि स्वतःच्या मेहनतीवर वयाच्या ४० व्या वर्षी तो मॅककिन्सचा CEO झाला. ही कंपनी २००७ मध्ये जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित सल्लागार कंपनी होती.

हळूहळू तो अतिश्रीमंत लोकांचा मित्र बनला, बिल गेट्स च्या सामाजिक कार्यात तो भाग घेऊ लागला. या काळातच त्याच्याकडे राक्षसी संपत्ती निर्माण झाली ती इतकी होती की २००८ ला फक्त त्यावर व्याज पकडले तर तासाला त्याच्या अकाउंट मध्ये 600 डॉलर सहज मिळतील इतके.

उरलेल्या आयुष्यात त्याने काही नाही केले तरी चालले असते पण त्याला अमेरिकेतील टॉप १०० अतिश्रीमंतांच्या यादीत जायचे होते यासाठी त्याने मग शॉर्टकट चा मार्ग निकडला शेअर बाजारातील Insider ट्रेडिंग चा… म्हणजे शेअर बाजारातील काही खाजगी माहितीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करायचा.

यात तो फसला गेला आणि आता या आर्थिक गुन्ह्यात सगळी संपत्ती गमावून बसला त्याच बरोबर समाजातील प्रतिष्ठा धुळीस मिळवून शेकडो करोड रुपये कमाऊन सुद्धा अति हव्यासापायी शुन्य नाही तर संपूर्ण आयुष्य देशोधडीला लावून बसला.

रजत गुप्ता सारखे अति हव्यास करणारे सगळीकडे दिसतात. ५-१०% महिन्याला मिळवण्यासाठी १००% देशोधडीला लावणारे आणि ५-१०% महिन्याला देणारे हे ही याच कॅटेगरी मध्ये. हळूहळू हा खेळ इतका मोठा होतो की देणारा आणि घेणारा यांना कुठे थांबायचे कळत नाही. कारण १० लाखाला महिन्याला मिळणारा १ लाखाचा झरा कुणाला थांबवायाचा नसतो आणि १०% देणाऱ्याला लोकांना पैसे वाटायला नवीन १००% हवे असतात.

योजना संपली कि तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय नसतो… काही तर मी कसा नफ्यात बाहेर पडलो याच्या रंजक कहाण्या आयुष्य भर सांगत फिरणार आहेत (खरे लॉस मध्ये असले तरिही)

संदर्भ : पैश्याचे मानसशास्त्र
लेखक : मॉर्गन होउजेल

शेअर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुमच्यासाठी सुचवलेले